

ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने चाकूचा हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून पडली आहे. माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावर त्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.
ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून पिंपळे यांच्यावर चाकूने अचानक हल्ला करण्यात आला. बचावासाठी त्यांनी हात वर केल्यावर त्यांची दोन बोटेच तुटून पडली. पिंगळे बचावासाठी धावलेल्या अंगरक्षाचेही एक बोट तुटले आहे.
कल्पिता पिंपळे यांना जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आले. तर अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचले का?