

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीच्या पुरूष एकेरीत भारताचा तिरंदाज अतानू दास याला पराभवाचा धक्का बसला. अंतिम आठसाठीच्या फेरीत अतानू दास याला जपानच्या ताकाहारू फुरुकावाने ६-४ अशा सेटमध्ये हरवले. यामुळे तिरंदाजीमधील पदकाच्या आशा मावळल्या आहेत.
दरम्यान, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला काल शुक्रवारी महिलांच्या तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता अतानू दासचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास थांबला आहे.
अतानू दास याने ३२ व्या फेरीत दक्षिण कोरियाचा दिग्गज तिरंदाज जीन हेक याचा पराभव केला होता. जीन हेक याने लंडन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पण, अतानू दासने त्याला मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत मात दिली होती.
अतानू दास याचा सामना जपानच्या ताकाहारू फुरुकावा याच्याबरोबर शनिवारी झाला. यात त्याचा पराभव झाला.
बॉक्सिंगच्या ४८-५२ किलो वजनी गटात सोळासाठीच्या राऊंडमध्ये भारताचा बॉक्सर अमित पांघलचा पराभव झाला. त्यावा कोलंबियाच्या युर्बेजेन मार्टिनेझने ४-१ असे हरवले.
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यामुळे ती ऑलिम्पिक पदकाच्या आणखी जवळ पोहोचली आहे. यामुळे सर्वांच्या नजरा पी.व्ही. सिंधूच्या उपांत्य फेरीतील सामन्याकडे लागल्या आहेत.
दरम्यान, नेमबाजीमध्ये महिलांच्या ५० मीटर ३ पोझिशनच्या स्पर्धा आज होत आहेत. यामध्ये अंजुम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत यांचा सहभाग आहे.
हे ही वाचा :