गडचिरोली : चौथ्या दिवशी १७ मार्ग बंद, आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी

गडचिरोली : चौथ्या दिवशी १७ मार्ग बंद, आरमोरीनजीकच्या वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी
Published on: 
Updated on: 

गडचिरोली : जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आला असून, चौथ्या दिवशी तब्बल १७ वाहतूक मार्ग बंद झाले आहेत. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.

जिल्ह्यात कोसळलेला मुसळधार पाऊस आणि संजय सरोवर, गोसेखुर्द, मेडिगड्डा व अन्य धरणांचे पाणी सोडल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, आज चौथ्या दिवशी तब्बल १७ मार्गांवरील वाहतूक बंद आहे. पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील अनेक दुकाने आणि घरे पाण्याखाली गेली आहेत.

, पर्लकोटाचा पूर आज दुपारपासून ओसरु लागला आहे. याबरोबरच आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरुनही पाणी वाहू लागल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. हाही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुरामुळे गडचिरोली-आरमोरी आणि गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, आष्टी-आलापल्ली, आष्टी-गोंडपिपरी या प्रमुख मार्गांसह तब्बल १७ अंतर्गत मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.  जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news