Latest
उत्तरप्रदेश : शेतकर्यांनी योगींच्या सभेत सोडले वळू
बाराबंकी : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाराबंकी येथील सभेत शेतकर्यांनी सभास्थानापासून 500 मीटर अंतरावरून शेकडो गायी, म्हशी, वळू सभेच्या दिशेने सोडले. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी बांबूंच्या सहाय्याने या जनावरांना सभास्थळी घुसण्यापासून रोखले.
- सांगली : बैलगाडी पुढे पळविल्याच्या रागातून एकाला बेदम मारहाण, नऊ जणांविरूद्ध गुन्हा
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनाही कळले पाहिजे की गाय, वळू यांच्यामुळे आम्हाला किती अडचण होते. यासाठीच आम्ही ही जनावरे सोडली, असे ते म्हणाले. दरम्यान योगींनी भाषणात या भटक्या जनावरांचाही उल्लेख केला. गोवंशाला कत्तलखान्यात पाठवू देणार नाही, शेतकर्याचे पीकही नष्ट होऊ देणार नाही, असे योगी सभेत म्हणाले.
पाहा व्हिडिओ
देशभराचे लक्ष लागून असलेल्या चारा घोटाळा निकाल : दैनिक पुढारीचा हा विशेष अग्रलेख
हेही वाचलत का ?

