आयपीएल स्टार राशीद खान : ‘अफगाणिस्तानमधून माझ्या कुटुंबाला बाहेर नेऊ शकत नाही’

आयपीएल स्टार राशीद खान
आयपीएल स्टार राशीद खान
Published on
Updated on

काबूल; पुढारी ऑनलाईन : आयपीएल स्टार राशीद खान : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी नंगानाच पुन्हा एकदा सुरु केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानमधील संघर्षात फिरकीपटू राशिद खान अत्यंत चिंतीत आहे. तो कसा आहे याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने माहिती दिली आहे.

पीटरसनने माहिती देताना सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सध्या ज्या प्रकारे तणावपूर्ण परिस्थिती आहे, याबद्दल फिरकीपटू राशिद खान खूप चिंतित आहे. पीटरसन म्हणाला की, सध्या रशीद आपल्या कुटुंबाला देशाबाहेर नेण्यास सक्षम नाही.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सध्या काबुलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभूतपूर्व गर्दी झाली आहे. त्यामुळे विमानसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. विमानतळावर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राशीद खान सध्या यूकेमध्ये आहे जिथे तो द हंड्रेड लीगमध्ये ट्रेंट रॉकेट्सकडून खेळत आहे.

आयपीएल स्टार राशीद खान : आम्हाला मरणाच्या दारात सोडू नका 

काही दिवसांपूर्वी रशीदने अफगाणिस्तानमध्ये तालिबानची वाढती क्रूरता पाहता अफगाण लोकांना वाचवण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून जागतिक नेत्यांना आवाहन केले होते.

जगातील अव्वल दर्जाच्या फिरकीपटूंपैकी एक असलेला रशीद खानने ट्विट केले होते, 'जगभरातील प्रिय नेत्यांनो! माझा देश संकटात आहे. महिला आणि मुलांसह हजारो लोकांचा दररोज बळी जात आहे. घरे आणि मालमत्ता नष्ट होत आहेत. लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले जात आहे. या कठीण काळात आम्हाला एकटे सोडू नका. अफगाणिस्तान आणि तेथील लोकांना विनाशापासून वाचवा. आम्हाला शांतता हवी आहे. '

तालिबान गेली २० वर्षे सरकारशी युद्ध करत आहे

तालिबान २००१ पासून अमेरिका समर्थित अफगाण सरकारशी युद्ध लढत आहे. अफगाणिस्तानात तालिबानचा उदय अमेरिकेच्या प्रभावामुळेही झाला. आता तोच तालिबान अमेरिकेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे.

१९८० च्या दशकात, जेव्हा सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानात सैन्य दाखल केले, तेव्हा अमेरिकेनेच स्थानिक मुजाहिदीनला शस्त्रे आणि प्रशिक्षण देऊन युद्ध भडकवले होते. परिणामी, सोव्हिएत युनियनने हार मानली, पण अफगाणिस्तानात तालिबान या मूलगामी दहशतवादी संघटनेचा जन्म झाला.

काबूलवरही तालिबानची सत्ता

तालिबानने अफगाण सरकारचा शेवटचा किल्ला काबूल आपल्या ताब्यात घतेले आहे.

यासह, तालिबानने २० वर्षांनी काबूलमध्ये पुन्हा आपले राज्य प्रस्थापित केले आहे.

२००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यामुळे तालिबानला काबूल सोडून पळून जावे लागले होते.

हे ही वाचलं का?

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news