झोमॅटोने ‘सीएफओ’ का नियुक्‍त केले? जाणून घ्‍या यामागील कारण

झोमॅटोने ‘सीएफओ’ का नियुक्‍त केले? जाणून घ्‍या यामागील कारण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोजच्या धावपळीच्या जग‍ण्यात फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. सरकारी असो की खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर फिटनेस व्यवस्थित ठेवण्‍याचे माेठे आव्‍हान असते. सध्या फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने  यावर मार्ग शोधला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांचा फिटनेस चांगला राहावा यासाठी नवीन पदाची निर्मिती केली आहे. (Zomato Appoints New Fitness Officer) कंपनीचे हे नवे पद सध्या खूप चर्चेत आहे. याबाबत जाणून घेऊया…

ऑनलाईन फूड डिलीव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीने नवीन 'सीएफओ' पदाची घोषणा केली. या CFO पदाचा अर्थ मुख्य वित्तीय अधिकारी (Chief Finance Officer) असा नाही, तर मुख्य फिटनेस प्रशिक्षक अधिकारी असा आहे. या नवीन पदाची जबाबदारी दिपंदर गोयल (Deepinder Goyal) यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. हे नवीन पद कंपनीच्‍या कर्मचाऱ्याना फिटनेसविषयक माहिती देणार आहे. कर्मचार्‍यांनी आराेग्‍याची काळजी कशी घ्‍यावी, याचीही माहिती देण्‍यात येणार आहे. ( Zomato Appoints New Fitness Officer)

'सीएफओ' काय काम करणार?

यासंदर्भात माहिती देताना झोमॅटोचे सीईओ म्हणाले की नवीन सीएफओ प्रशिक्षक हे पोषणतज्ञ आणि कल्याण सल्लागारांच्या इन-हाउस वेलनेस टीमसोबत काम करेल. तसेच कर्मचार्‍यांना वजन आणि तंदरुस्तीचे प्रशिक्षण, योगा  इत्यादींमध्ये मदत करतील. (Weight and fitness training, yoga, boxing)

'झोमॅटो'ला अधिक तंदुरुस्त बनवण्यासाठी

झोमॅटोच्या सीईओने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या फिटनेस प्रवासाविषयीची चर्चा केली, त्यांनी म्‍हटलं आहे की, २०१९ मध्ये त्यांचे वजन ८७ किलो होते; परंतु 2023 मध्ये ते 72 किलोपर्यंत कमी केले. त्यांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी आणि शरीरातील चरबीची टक्केवारी सुधारली आहे. तसेच आरोग्यविषयक समस्या देखील कमी झाल्‍या आहेत. आता कंपनीतील प्रत्‍येक कर्मचार्‍याचे आपल्‍या आराेग्‍याची याेग्‍य काळजी घ्‍यावी यासाठी कंपनी झोमॅटो सीएफओ प्रशिक्षक, पोषणतज्ञ आणि कल्याण सल्लागारांच्या इन-हाउस वेलनेस टीमसोबत काम करेल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news