Madhavi Latha : ओवेसींविरोधात भाजपच्‍या उमेदवार माधवी लता कोण आहेत?

Madhavi Latha
Madhavi Latha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर हाेणार असल्‍याने सर्वच पक्षांनी  तयारी सुरु केली आहे. भाजपने शनिवारी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघाचे 'एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. आता माधवी लता ओवेसी यांच्यासमोर आव्हान उभे करणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Madhavi Latha

 कोण आहेत माधवी लता ?

कोटी महिला महाविद्यालयातून राज्यशास्त्रातून एमए पदवी घेतलेल्या माधवी लता विरिंची हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. तसेच लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाउंडेशनच्या प्रमुख आहेत. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. भरतनाट्यम कलाकार म्‍हणूनही त्‍यांची ओळख आहे. हैदराबादमध्ये सामाजिक कार्यात त्या कायम सक्रीय असतात. त्याचबरोबर ट्रस्ट, संस्था, आरोग्यसेवा, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.

Madhavi Latha: हैदराबाद मतदारसंघावर १९८४ पासून ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व

हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. ओवेसींचा हा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. २००४ पर्यंत ते खासदार राहिले. त्यानंतर आतापर्यंत असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार पद आपल्या हातात कायम ठेवले आहे.हा मतदारसंघ ओवेसी यांच्या ताब्यातून खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी माधवी लता यांना रिंगणात उतरवले आहे.

भाजपकडून पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी

हैदराबाद मतदारसंघातून भाजपने पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी पक्षाने भागवत राव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भागवत यांना ओवेसींकडून सुमारे ३ लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपने महिला उमेदवार देऊन लढत चुरशीचा करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु, ओवेसी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करणे मोठे आव्हान आहे. आता या आव्‍हानाला माधवी लता कशा समाेर्‍या जातात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news