Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; धनगर समाजाचे पहिले खासदार       | पुढारी

Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; धनगर समाजाचे पहिले खासदार      

उमेश काळे

अलिकडच्या काळात निवडणुकांमध्ये जातपात, धर्माचे अवडंबर माजल्याचे दिसते, जात आणि धर्म पाहून उमेदवाराला मते दिली जातात. प्रारंभीच्या काळात मात्र मतदार या विचारांना थारा देत नसत. सर्वच जातींचे उमेदवार लोकसभा/विधानसभेत पोहचत. त्याची  कारणे पक्षनिष्ठा, वैचारिक बांधिलकी, समाजाप्रती असणारा सहजभाव अशी असावित. सत्तेचा उपयोग स्वतःची घरे भरण्यासाठी न करता समाजासाठी करण्याची मनस्वी वृत्ती त्या काळात होती. (Lok Sabha Election 2024 )
फोटो  रखमाजी गावडे

Lok Sabha Election 2024 | ८० हजारांची रक्कम पीएम फंडाला दिली…

उदाहरणच द्यावयाचे झाल्यास बीड मधून दुसऱ्या लोकसभेवर निवडून गेलेल्या रखमाजी धोंडिबा पाटील गावडे यांचे देता येईल. निवडणूक आयोग वा अन्य काही वेबसाईटस्  वर त्यांची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण रखमाजी गावडे हे धनगर समाजाचे पहिले खासदार होते, ही नोंद विशेष ठरते. १९५७ च्या निवडणुकीत त्यांनी माकपचे काशिनाथ तात्याबा यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. रखमाजी यांनी केलेल्या कामाची माहिती महेश पिंगळे यांनी त्यांच्या फेसबूकवर दिली आहे. रखमाजी हे काँग्रेसचे कार्यकर्तै. गांधीवादाचे तत्वज्ञान आचरणात आणणारे. लोकसभेवर जाण्यापूर्वी ते आंध्र विधानसभेत आमदार होते. पं. नेहरु, सरदार पटेलांशी त्यांचे संबंध. केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेले रखमाजी हे मुक्तिसंग्रामाही सहभागी होते. १९६२ ला चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर त्यांनी वेतन, भत्ते नाकारुन असणारी ८० हजारांची रक्कम पीएम फंडाला दिली. काँग्रेस सरकारने सिलिंग अॕक्ट आणल्यानंतर त्यांच्या नावे असणारी जादा जमिन गरिबांच्या नावावर केली. असे होते सुरवातीचे खासदार.
निवडणुकांमध्ये ना मतदारांना पैसे वाटण्याची गरज नव्हती ना उमेदवाराला पार्टीकडून पैसे मिळत.नांदेडचे खासदार देवराव कांबळे यांचा निवडणुकीचा खर्च झाला होता ३५० रुपये. एसटी बस, बैलगाडी तर कधी पायी प्रवास करणारे तेव्हाचे नेते.कार्यकर्त्याकडेच जेवण आणि निवास…आता मात्र सारे काही बदलले आहे.

हेही वाचा 

Back to top button