Anish Jog : सई ताम्हणकरचा पार्टनर अनिश जोग आहे तरी कोण?
पुढारी ऑनलाईन डेस्क
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या आयुष्यात ज्या खास व्यक्तीची एन्ट्री झालीय, तो व्यक्ती कोण आहे, तुम्हाला माहितीये का? सध्या सईची सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. सई ताम्हणकर हिच्या दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्टवरून तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका खास माणसाची एन्ट्री झाल्याचं दिसलं. हा व्यक्ती अनिश जोग आहे. सईने मराठी निर्माता अनिश जोगचा (Anish Jog) एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत तिने लिहिले होते की – 'दौलतराव सापडला.' (Anish Jog)
हा फोटो व्हिडिओ कॉल दरम्यानचा असल्याचं दिसत होतं. दुसरीकडे अनिश जोगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शन लिहिली होती-Magic! #youandme.
नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या कपलच्या फोटोवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचसोबत सईच्या फॅन्सनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.
अनिश जोग आहे तरी कोण?
सईचा जोडीदार नेमका आहे तरी कोण? अनिश जोग चित्रपट निर्माता आहे. त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केलीय. अनिशने 'बायकोला हवं तरी काय' या वेब सीरिजच्या ६ भागांची निर्मिती केली आहे. टाइम प्लिज, व्हायझेड, मुरंबा, गर्लफ्रेंड, धुरळा असे चित्रपट त्याने आणले आहेत. अनिशचं इन्स्टा अकाऊंट पाहिलं तर त्याला फोटोग्राफीची आवड असल्याचे दिसते. अनेक सुंदर फोटो त्याने कॅमेराबध्द केले आहेत. त्याच्या इन्स्टावर हे फोटो पाहायला मिळतात.
सईदेखील प्रसिध्द मराठी अभिनेत्री आहे. दुनियादारी, 'बालक पालक', तू ही रे, धुरळा, गर्लफ्रेंड, पुणे ५२, क्लासमेट्स, मिमी, हंटर, वजनदार, नो एन्ट्री पुढे दोका आहे, प्यारवाली लव्ह स्टोरी, पाँडिचेरी, सौ. शशी देवधर असे एकापेक्षा एक हिट चित्रपट तिच्या नावावर आहेत.
हेदेखील वाचा-

