

‘सरकार 4’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी दिलेल्या अपडेटमुळे पुन्हा एकदा या फ्रँचायझीची चर्चा रंगली आहे. विशेषतः ऐश्वर्या राय बच्चनबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे आणि तिच्या भूमिकेबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
ram gopal varma talked about sarkar 4
लोकप्रिय पॉलिटिकल-क्राईम चित्रपट 'सरकार'चे तीन भाग आधी रिलीज झाले आहेत. त्यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, मनोज वाजपेयी यांच्या भूमिका होत्या. आता चित्रपट निर्माता राम गोपाल वर्माने ऐश्वर्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 'सरकार' हा प्रसिद्ध चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पुढील दोन्ही फ्रेंचायझीची जितकी चर्चा होती, तितकीच चर्चा सरकार ४ बद्दल सुरु आहे.
'गॉडफादर' या चित्रपटापासून प्रेरित असलेल्या या चित्रपटाच्या कथेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. इतकेच नाही तर ऐशवर्याचा चाहत्यांचा एक मोठा वर्ग आहे. पण, आता त्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. राम गोपाल वर्मा यांनी सरकार ४ बद्दल मोठी अपडेट दिलीय.
राम गोपाल वर्माला ऐश्वर्याच्या सरकार ४ मधील भूमिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, "नाही, मुळीच नाही. ऐश्वर्या यात नाही." एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, कथेचा आवाका अधिक मोठा असणार आहे. कथा यावेळी वेगळी असेल..." राम गोपाल वर्मा यांनी हे देखील उघड केले की, 'सरकार ४' च्या चित्रीकरणाला पुढील महिन्यात सुरुवात होईल.
‘सरकार’ मालिकेतील प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. दमदार कथा, राजकारणावर आधारित पार्श्वभूमी आणि प्रभावी अभिनय यामुळे या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘सरकार 4’ येणार असल्याची शक्यता व्यक्त होताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
'सरकार' मूळ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी 'सुभाष नागरे' ही भूमिका साकारली होती. अभिषेक बच्चनने त्याच्या पडद्यावरील मुलाची, म्हणजेच शंकरची भूमिका साकारली. 'सरकार राज' या सिक्वेलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनची 'अनिता राजन' भूमिका होती. सरकार' (२००५), 'सरकार राज' (२००८), 'सरकार ३' (२०१७) रिलीज झाला होता. आता 'सरकार ४' ची प्रतीक्षा सिनेप्रेमांना लागून राहिली आहे.