

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत धुवाँधार बरसल्यानंतर पावसाचा जोर आता काहीसा कमी झाला आहे. राज्यात पुढील ३, ४ दिवस पावसात घट होईल. त्यानंतर २ ऑगस्टच्या आसपास राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. (Weather Forecast)
पुढील २, ३ दिवसांत पालघर, ठाणे, घोडबंदर, नाशिक, नंदूरबार, पुणे आणि साताऱ्यातील घाट क्षेत्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत ढगाळ हवामान राहील. आज मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात जुलैअखेर २३ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा किंचित जास्त म्हणजे साधारण पाऊस झाला आहे. चार जिल्ह्यांत अतिवृष्टी, तर ६ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. सांगली, सातारा, जालना या तीन जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. राज्यात एकूण सरासरीच्या १७ टक्के पाऊस जास्त झाला आहे. जुलैमध्ये मान्सूनचा पाऊस ८० टक्के पडतो. याच महिन्यावर जास्त मदार असते. परंतु, यंदा २४ जुलै रोजी राज्यात मान्सून आला. त्यानंतरही १५ जुलैपर्यंत जोर कमी होता. जुलैच्या दुसर्या व शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने बहार आणली. या पंधरा दिवसांत राज्यातील पावसाची मोठी तूट पावसाने भरून काढत जुलैअखेर १७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. (Weather Forecast)
हे ही वाचा :