राज्यात पावसाची जोरदार बॅटींग ! सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस | पुढारी

राज्यात पावसाची जोरदार बॅटींग ! सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात जुलैअखेर 23 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा किंचित जास्त म्हणजे साधारण पाऊस झाला आहे. चार जिल्ह्यांत अतिवृष्टी, तर 6 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला आहे. सांगली, सातारा, जालना या तीन जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. राज्यात एकूण सरासरीच्या 17 टक्के पाऊस जास्त झाला आहे. जुलैमध्ये मान्सूनचा पाऊस 80 टक्के पडतो. याच महिन्यावर जास्त मदार असते. परंतु, यंदा 24 जुलै रोजी राज्यात मान्सून आला. त्यानंतरही 15 जुलैपर्यंत जोर कमी होता. जुलैच्या दुसर्‍या व शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने बहार आणली. या पंधरा दिवसांत राज्यातील पावसाची मोठी तूट पावसाने भरून काढत जुलैअखेर 17 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

जिल्हावार पाऊस (सरासरी) (1 जून ते 27 जुलै 2023 पर्यंत)

कोकण विभाग : (15 टक्के जास्त) : मुंबई (26), पालघर (65), रायगड (46), रत्नागिरी (14), सिंधुदुर्ग (24), मुंबई उपनगर (71), ठाणे (62).
मध्य महाराष्ट्र : (सरासरी इतका, 0 टक्के जास्त) : नगर (-11), धुळे (-4), जळगाव (17), कोल्हापूर (6), नाशिक (11), पुणे (6), सांगली (-31), सातारा (-24), सोलापूर (सरासरी इतका).
मराठवाडा : (15 टक्के जास्त) छत्रपती संभाजीनगर (-12), बीड (-7), हिंगोली (-14), जालना (-37), लातूर (38), नांदेड (85), धाराशिव (14), परभणी (सरासरी इतका).
विदर्भ : (15 टक्के जास्त) : अकोला (-4), अमरावती (-8), भंडारा (26), बुलडाणा (सरासरी इतका), चंद्रपूर (25), गडचिरोली (17), गोंदिया (4), नागपूर (13), वर्धा (11).

विभागवार पावसाची आकडेवारी
कोकण विभाग ः (36 टक्के जास्त)
सरासरी ः 1,650.6, पडला : 2,243.7 मि.मी.
मध्य महाराष्ट्र : (सरासरी इतका) (0 टक्के जास्त)
सरासरी ः 363.6, पडला : 364.4 मि.मी.
मराठवाडा : (15 टक्के जास्त)
सरासरी : 285.5, पडला : 328.3 मि.मी.
विदर्भ : (15 टक्के जास्त)
सरासरी : 456, पडला : 524 मि.मी.
सर्वाधिक पाऊस
नांदेड ः 85 टक्के
ठाणे : 62 टक्के
मुंबई उपनगर : 71 टक्के
पालघर ः 65 टक्के

हेही वाचा :

Rain Update : मुंबईसह कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारचा इशारा

पुणेकरांनो या दिवशी पीएमपीच्या काही मार्गांमध्ये असतील बदल

Back to top button