

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांबाबत पक्षामध्ये नवीन उत्साह दिसून येत आहे. या निवडणुकीची तयारीही पक्षाने सुरु केले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १५० जागा जिंकेल, असा विश्वास पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी व्यक्त केला आहे.
( Madhya Pradesh Politics )
या वर्षाच्या अखेरीस राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तयारीबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या राज्य युनिट आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला राहुल गांधी आणि पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपालही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आम्हाला १३६ जागा मिळाल्या आहेत. आम्ही कर्नाटकात जे केले त्याचीच पुनरावृत्ती आम्ही मध्य प्रदेशात करणार आहोत. मध्य प्रदेशात आम्हाला 150 जागा मिळतील, असे आमचे अंतर्गत मूल्यांकन सांगते, असेही राहुल गांधींनी सांगितले.
या वेळी राहुल गांधींना मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कोण होणार असा सवाल करण्यात आला. यावर ते म्हणाले, 'आम्हाला १५० जागा मिळतील' हेच उत्तर देत राहुल गांधींनी राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या प्रश्नाला बगल दिली.
काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कमलनाथ यांचा दावा प्रबळ आहे. दिग्विजय सिंह यांच्या नावाचीही चर्चा होती, पण दिग्विजय सिंह यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून स्वत:ला मागे घेतलं होतं, आपण मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही. मध्य प्रदेशात गेल्या दोन दशकांपासून भाजपचे राज्य आहे, मध्यंतरी काँग्रेसचे सरकार आले पण ते फार काळ टिकू शकले नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते.
हेही वाचा :