ईशान्येतील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींचा ग्रीन सिग्नल | पुढारी

ईशान्येतील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींचा ग्रीन सिग्नल

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. ईशान्येत दाखल झालेली ही पहिली वंदे भारत ट्रेन आहे. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह गुवाहाटी रेल्वे स्थानकाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

ईशान्येकडील वंदे भारत पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्टेशन आणि आसाममधील गुवाहाटी दरम्यान धावेल. या ट्रेनमुळे सध्याच्या वेगवान ट्रेनच्या तुलनेत सुमारे एक तासाचा वेळ वाचणार आहे. सध्याच्या सर्वात वेगवान ट्रेनच्या तुलनेत ही ट्रेन 411 किमी लांबीचा प्रवास साडेपाच तासांत पूर्ण करेल. 530 प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या या ट्रेनला आठ डबे असतील. गुवाहाटी- न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी अशी धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 31 मे पासून सुरू होणार आहे. वंदे भारत ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button