

पुढारी ऑनलाईन डेस्क : चालणे हा जगभरातील सर्वात लोकप्रिय व्यायाम आहे. कमी खर्च आणि साधनांशिवाय करता येणार्या या व्यायाम प्रकाराबाबत आजवर अनेक संशोधन झाले आहेत. सकाळी उठल्यानंतर चालण्याचे लक्षणीय फायदे आहेत. वजन कमी करणे, ह्दयाचे आरोग्य सुधारण्याबरोबर शरीरातील उर्जा वाढविण्यासही चालण्यामुळे मदत होते. त्याचबरोबर हा व्यायाम प्रकार मानसिक तणाव कमी करण्यासही मदत करतो. ( Waking habits ) मात्र तुम्ही चालण्याचा व्यायाम कसा करता, यावर त्याचे फायदे ठरतात हे इंग्लंडमधील लीसेस्टर विद्यापीठात संशोधनात स्पष्ट झाले आहे. लीसेस्टर विद्यापीठातील संशोधनानुसार चालण्याच्या व्यायामात कोणते बदल करावेत याविषयी जाणून घेवूया…
तुम्ही सकाळी उठून चालण्याचा व्यायाम करत असाल तर उत्तमच;परंतु तुम्ही दिवसभरात दोन वेळा चालण्याचा व्यायाम करत असला तरी याचे शरीराला उत्कृष्ट फायदे होतात. दोनवेळा चालण्यामुळे तुमचा व्यायाम अधिक होतो. तसेच एकाचवेळी खूप चालण्यामुळे शरीर थकते. यापासूनही सुटका तर होतेच त्याचबरोबर शरीरात अधिक उर्जा निर्माण होते. दिवसभरात दोनवेळा केव्हा चालावे, याचे नियोजन तुम्हाला करावे लागेल. तसेच रात्री जेवल्यानंतर चालणे हे अधिक फायदेशीलर ठरते. कारण रात्रीच्या जेवल्यानंतरच्या चालण्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
तुम्ही सर्वसाधारणपणे चालता त्यावेळी कोणतेही वजन नसते. मात्र तुम्ही पॉवर वॉकिंगचा अनुभव घ्या. तुम्ही तुमच्या दोन्ही हातात हलके वजन घेवून चालला तर याचा फायदा होतो. तुमचे शरीर तुम्हाला शारीरिक कष्ट करायला प्ररीत करेल. तसेच कॅलेरीज कमी होण्यास मदत होते. मात्र एक लक्षात ठेवा की, कधीच अधिक वजन उचलून चालू नका. यामुळे मान आणि खांद्याना दुखापत होण्याचा धोका असतो. दोन्ही हातात हालके वजन घेवून तुम्ही चाललात तर अधिक फायदा होतो, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.
चालणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम मानला जातो. कारण त्याचे शारीरिक तर फायदे आहेतच त्याबरोबर मानसिक दृष्ट्याही तुम्हाला या व्यायामाचा लाभ होतो. तुम्ही चालण्चा वेग वाढवला तर हृदयाचे ठोके वाढतात. वेगाने चालल्यामुळे अधिक कॅरीज कमी होण्यास मदत होते. तुम्ही जेवढया वेगाने आता चालता म्हणजे एका मिनिटाला तुम्ही किती पावले चालता याकडे लक्ष द्या, त्यापेक्षा केवळ २० सेंकदांनी जरी तुम्ही चालण्याचा वेग वाढवला तरीही ते खूपच फायदेशील ठरते, असेही लीसेस्टर विद्यापीठात संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा :