Eye Health Tips : आरोग्यदायी डोळ्यांसाठी करा 'ही' योगासने | पुढारी

Eye Health Tips : आरोग्यदायी डोळ्यांसाठी करा 'ही' योगासने

पुढारी ऑनलाईन: दिवसेंदिवस माणसाच्या दैनंदिन जीवनात स्क्रिनचा वापर वाढत आहे. मग ती स्क्रीन मोबाईलची असो, TV ची की कॉम्प्युटरची. दैनंदिन जीवनातील स्क्रिनचा दुष्परिणाम डोळ्यांवर देखील होत आहेत. स्क्रीनच्या अति वापरामुळे डोळ्यावर ताण येऊन डोळ्यांच्या अनेक समस्या देखील उद्भवत आहेत. याचबरोबर मंद प्रकाशात वाचन करणे, तेजस्वी आणि ब्राईट लाईटच्या नेहमी संपर्कात असल्यानेही डोळ्यांना ईजा पोहचू शकते. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी ( Eye Health Tips) घेणे गरजेचे आहे, डोळे आरोग्यदायी ठेवण्यासाठी ही योगासने करणे डोळ्यासाठी फायदेशीर ठरते.

Eye Health Tips : डोळ्यांची उघडझाप करणे

Eye Health Tips
Eye Health Tips

डोळ्यांची उघडझाप करणे हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. जेव्हा आपण डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा डोळ्याचा पृष्ठभाग स्वच्छ होतो. पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. कॉम्प्युटर, मोबाईल किंवा TV स्क्रीन पाहत असताना आपल्या डोळ्यांची उघडझाप खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे थोडा ब्रेक घेऊन डोळ्यांची उघडझाप केल्यास फायद्याचे ( Eye Health) ठरते.

 डोळ्यांवर तळहात ठेवा

ऑफीसमध्ये किंवा सतत स्क्रिनसमोर काम केल्याने डोळे थकतात.त्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी ( Eye Health) दोन्ही तळवे एकत्र चोळा आणि डोळ्यावर ठेवा. यावेळी दोन्ही डोळे झाकून घ्या. ही कृती ३ ते ४ वेळा करा महणजे डोळ्यांना आराम मिळेल. डोळ्यांना आराम देण्यासाठी हे सर्वोत्तम योगासन आहे. हा व्यायाम दररोज काही मिनिटांसाठी केल्यास डोळ्यांचा थकवा दूर होऊन, दृष्टी तेजस्वी होती.

डोळे फिरवणे (आय रोलिंग)

Simple Eye Exercises for Vision Improvement - Cross Fit Mean Streets

याप्रकाच्या डोळ्यांच्या योगासनामध्ये डोळे हळूवारपणे सलग २ ते ३ मिनिट गोलाकार फिरवावे. यामध्ये पहिल्यांदा 10 वेळा डोळे क्लॉकवाईज तर नंतर 10 वेळा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये डोळे फिरवावेत. तर दुसऱ्या प्रकारात भिंतीवर एका मोठ्या वर्तुळाची कल्पना करा. दोन्ही डोळ्यांनी त्या काल्पनिक वर्तुळावर नजर फिरवा. तुमच्या डोळ्यासमोरील भिंतीवर दोन टोकांना दोन बिंदूंची कल्पना करा, आणि त्या दोन बिंदूंवर फक्त डोळ्यांची फिरवा. या डोळ्यांच्या योगासनामुळे डोळ्यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते.

Eye Health Tips : फोकस शिफ्टिंग

अनेकदा कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या स्क्रीनवर सतत काम केल्याने कडे डोळ्यांचे स्नायू कमकुवत होतात. याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चष्मा लागू शकतो किंवा नंबर वाढूही शकतो. त्यामुळे तुमच्या हाताचा अंगठा चेहऱ्यापासून 10 इंच अंतरावर ठेवा. 10-20 फूट अंतरावर असलेल्या एका वस्तूवर केंद्रित करा. त्यानंतर पुन्हा हळूहळू तुमचे लक्ष अंगठ्याकडे वळवा. ही कृती 4 ते 5 वेळा करा.

एकटक नजर लावून पाहणे

सूर्य उगवताना किंवा मावळताना त्याच्या किरणांकडे एकटक पहा. वातावरणातील बदलांमुळे जर सूर्य दिसत नसेल तर, एखाद्या वस्तूकडेही एकटक नजर लावून पाहू शकता.

हेही वाचा:

Back to top button