The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या द कश्मीर फाईल्सवर सिंगापूरमध्ये बंदी

the kashmir files movie
the kashmir files movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

सिंगापूरमध्ये काश्मीर फाइल्स चित्रपटावर बंदी घातली आहे. ते म्हणतात की, हा चित्रपट समाजात वेगवेगळे मतभेद उत्पन्न करू शकतो. हा चित्रपट एकतर्फी असून त्यांच्या देशाची धार्मिक एकता भंग करू शकतो. सध्या सुरू असलेल्या काश्मीर वादात हिंदूंचा छळ होताना दाखवला गेलाय. तर मुस्लिमांचा पक्ष वनसायडेड आहे. हा चित्रपट भारतात ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. भारतातही सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली होती. या चित्रपटाचा अनेकांनी प्रचार केला आणि मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे सांगितले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे.

सिंगापूरने विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर बंदी घातली आहे. रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट एकतर्फी असल्याचे सिंगापूर प्राधिकरणाचे मत आहे. सिंगापूरने इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटी, संस्कृती, समुदाय आणि युवा मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या सहकार्याने एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या चित्रपटामुळे विविध समुदायांमधील वैर वाढू शकते, असेही त्यात म्हटले आहे. चित्रपटामुळे विविध धर्म मानणाऱ्या आपल्या समाजाची धार्मिक एकता बिघडू शकते. वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत, असे म्हटले आहे की, सिंगापूरमध्ये जाती आणि धार्मिक समुदायांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही गोष्ट वर्गीकृत केली जाऊ शकत नाही.

भारताच्या पंतप्रधानांकडून कौतुक 

कश्मीर फाईल्स ही १९९० मध्ये खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाची कहाणी आहे. त्यातून त्यांच्यावर झालेला अत्याचार दिसून येतो. भारतात द कश्मीर फाईल्स या चित्रपटाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी कौतुक केले होते. या चित्रपटाने ३०० कोटी क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news