पुणे : पुढारी वृत्तसेवा
अंदमानच्या समुद्रात 7 मे रोजी तयार झालेल्या 'असनी' चक्रीवादळाने सोमवारी आणखी वेग घेतला. या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले. हे चक्रीवादळ मंगळवारी (दि. 10) आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ सध्या अंदमान-निकोबार बेटांपासून 270, पोर्टब्लेअरपासून 450 किलोमीटरवर आणि आंध्र प्रदेश व पुरीपासून 610 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात आहे. मंगळवारी हे चक्रीवादळ उत्तर आंध— प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचेल. सध्या या चक्रीवादळाचा वेग ताशी 80 ते 90 किलोमीटर असून, मंगळवारी हा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर एवढा होण्याची शक्यता आहे.