

पूर्वी 'यूफो' (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस्' म्हणजेच 'उडत्या तबकड्या' पाहिल्याचे दावे जगभरातून अनेक लोक करीत असत. अशा उडत्या तबकड्या म्हणजे परग्रहवासीयांची (एलियन्स) अंतराळयाने असून ते अशा यानांमधून वेळोवेळी पृथ्वीला भेट देत असतात असे म्हटले जात होते. आता त्याच्याही पुढे जाऊन भन्नाट दावे केले जात आहेत
. एलियन्सनी आपले अपहरण केले होते असा दावा आजपर्यंत अनेकांनी केला आहे. आता शीरा लुमीरा रेजोइस नावाच्या महिलेने दावा केला आहे की एलियन्सनी तिच्या घरात येऊन तिची तीन स्त्रीबीजे काढून घेतली होती. आता ते अशा स्त्रीबीजांच्या सहाय्याने 'हायब—ीड बेबी' विकसित करीत आहेत. आपल्या या दाव्यांच्या पुष्टीसाठी तिने काही 'पुरावे'ही सादर केले आहेत!
तिने म्हटले आहे की एलियन्सनी 2018 मध्ये तिचे अपहरण करून तिला ताब्यात घेतले होते. तिच्या घरातच तिची स्त्रीबीजे काढून घेण्यात आली. अल्ट्रासाऊंड करून हे पाहता येऊ शकेल असेही तिचे म्हणणे आहे. ही घटना आपल्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय घटना असल्याचे तिने म्हटले आहे
. एलियन्सनी हा प्रकार त्यांच्या अंतराळयानात नेऊन नव्हे तर आपल्या घरातच केला असल्याचे तिने म्हटले आहे. तिने सांगितले, त्यावेळी मी घरात पहुडले होते आणि डोळ्यांवर हलकी झोप होती. अचानक एलियन्स घरात आले व त्यांनी हा प्रकार केला. त्यामुळे माझ्यामध्ये बराच बदल घडून आला आणि मी नवी ऊर्जा भरून घेण्यासाठी निसर्गाच्या सान्न्ध्यिात अधिकाधिक जाऊ लागले. अर्थातच शीराच्या या दाव्यावर अनेकांनी टीका केली आहे. तिचा हा दावा 'फेक' असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.