सातारा जिल्हा बँक : महिला प्रतिनिधी मतदार संघ- तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे महिलांमध्ये रंगत | पुढारी

सातारा जिल्हा बँक : महिला प्रतिनिधी मतदार संघ- तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे महिलांमध्ये रंगत

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महिला प्रतिनिधी मतदारसंघातील दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी पॅनलकडून संचालक राजेश पाटील-वाठारकर यांच्या पत्नी ऋतुजा पाटील व आ. शिवेंद्रराजे समर्थक कांचन साळुंखे तर विरोधी गटातून शेखर गोरे समर्थक चंद्रभागा काटकर व माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांच्या पत्नी शारदादेवी कदम या रिंगणात आहेत. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे लढाई रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

ऋतुजा पाटील यांना ना. बाळासाहेब पाटील यांचा असलेला पाठिंबा व पती राजेश यांचा असलेला जनसंपर्क या गोष्टींचा फायदा होणार आहे. तर कांचन साळुंखे यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा बँकेच्या माध्यामातून काम केले आहे. तसेच सत्ताधारी पॅनलमध्ये समाविष्ट असल्याने याचा फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे. शारदादेवी कदम यांचे फलटण तालुक्यातील गिरवी व आसपासच्या गावातील संस्थांवर वर्चस्व आहे. स्व. चिमणराव कदम यांचा वारसा, उंडाळकर घराण्याशी असलेले संबंध याचा फायदा शारदादेवींना होवू शकतो. चंद्रभागा काटकर यांना शेखर गोरे यांचे कार्यकर्ते मदत करतील. त्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या राहिल्याने त्यांच्यातील मतदार फोडण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून होण्याचा प्रयत्न आहे. या मतदार संघात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे.

पाहा व्हडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

Back to top button