नदीत सापडली 1800 वर्षांपूर्वीची चांदीची नाणी | पुढारी

नदीत सापडली 1800 वर्षांपूर्वीची चांदीची नाणी

जर्मनीत पुरातत्त्व संशोधकांना नदीच्या तळाशी दफन असलेल्या 1800 वर्षांपूर्वीच्या चांदीच्या नाण्यांचा ढीगच सापडला आहे. ऑग्सबर्ग शहरात ही नाणी शोधून काढण्यात आली. नदीच्या तळाशी असलेल्या एका खड्ड्यात ही नाणी विखुरलेल्या अवस्थेत पडली होती.
मुळात ही नाणी कशा पद्धतीने ठेवली होती हे समजलेले नाही.

ऑग्सबर्ग शहरातील पुरातत्त्व विभागाचे संचालक सेबस्टियन गॅरहोस यांनी ही नाणी शोधून काढली. या नाण्यांजवळ अन्य कोणतीही प्राचीन वस्तू किंवा कलाकृती सापडली नाही असे त्यांनी म्हटले आहे. जर्मनीच्या टुबिंगन विद्यापीठातील मुद्राशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन क्रमनिसेक यांनी सांगितले की ही नाणी पहिल्या ते तिसर्‍या शतकाच्या काळातील ‘डेनरी’ नाणी आहेत

. कदाचित ही चांदीची नाणी एखाद्या वस्तूमध्ये भरून जमिनीत लपवलेली असावीत. काळाच्या ओघात नाणी दफन केलेले ठिकाण वर्टच नदीच्या पुरात सापडले असावे व ही नाणी पाण्यात गेली असावीत. या नाण्यांच्या काळात रोमन साम—ाज्य वैभवाला पोहोचलेले होते.

 

Back to top button