नवी दिल्ली ः उन्हाच्या झळा वाढतील तसा लोकांचा कल कलिंगड, उसाचा रस, ताक, लस्सी, नाचणीची आंबिल आदींकडे वळतो आणि ते साहजिकच आहे. हे सर्व पदार्थ आरोग्यासाठीही लाभदायक ठरतात. आता तज्ज्ञांनी म्हटले आहे की, उन्हाळ्यात टरबूजही मोठ्या प्रमाणात आढळतात. हे फळही उन्हाळ्यामध्ये लाभदायक ठरते.
टरबुजात कॅल्शियम, लोह, 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे किडनी म्हणजेच मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राहते. शिवाय डोळे आणि रक्तदाबासाठीही ते उपयुक्त ठरते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही टरबुजाचे सेवन लाभदायक ठरते. टरबुजामध्ये 'जीआय' पातळी कमी असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते, त्यांच्यासाठी टरबूज लाभदायक आहे.
यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्थेसाठीही ते उपयुक्त आहे. रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठीही टरबूज गुणकारी आहे. टरबुजाच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठीही टरबुजाचे सेवन उपयुक्त आहे.
हेही वाचलंत का?