

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या हवाई बेटांवर अनेक (Volcano) ज्वालामुखी आहेत. आता त्यापैकीच एक असलेल्या आणि जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी ठरलेल्या 'मौना लाओ'चा सोमवारी उद्रेक झाला. सुमारे चार दशकांनंतर उद्रेक झालेल्या या ज्वालामुखीमुळे संपूर्ण आकाश लाल झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला होता. त्यानंतर आपत्कालीन दलाला अलर्टवर ठेवण्यात आले. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून निघालेला लाव्हा व अन्य घटक फार दूर गेले नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कोणतीही हानी झालेली नाही.
'मौना लाओ' ज्वालामुखीच्या (Volcano) उद्रेकानंतर बाहेर आलेला लाव्हा शिखरावरच राहिला; मात्र तो अतिशय दूरच्या भागातूनही दिसत होता. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे द़ृश्य जिओलॉजिकल सर्व्हेने बसवलेल्या कॅमेर्यात कैद झाले आहे. ज्वालामुखीच्या मुखातून एक लांबलचक लाव्हा प्रवाह बाहेर पडल्याचे दिसून आले. वास्तविक हवाई बेटावर 6 सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी 'मौना लाओ' हा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मानला जातो.
भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, 'मौना लाओ'चा 1843 पासून सुमारे 33 वेळा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीचा (Volcano) यापूर्वी 1984 मध्ये उद्रेक झाला होता. त्यावेळी 7 किलोमीटर परिसरात लाव्हा सलग 22 दिवस वाहत होता. 2018 मध्ये 'मौना लाओ'जवळ 'किलाउआ' ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामध्ये सुमारे 700 घरे उद्ध्वस्त झाली होती. सुदैवाने सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या 'मौना लाओ'मुळे कोणतीही हानी झालेली नाही. कारण, तेथे खूप उतार आहे आणि त्यामुळे लाव्हा खाली जाण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा :