Brinjal : काय सांगता! वांगी खाल्ल्याने वजन घटते?

Brinjal : काय सांगता! वांगी खाल्ल्याने वजन घटते?
Published on
Updated on

नवी दिल्ली : वाढते वजन ही मोठी समस्या आहे. त्यामुळे वजन कमी करण्याचे टेन्शन बहुतेकांची झोप उडवते. आपले वजन कसे कमी करायचे यासाठी लोक बरेच उपाय करत असतात. त्यात अमूक पदार्थ खायचे नाही, तमूक खायचे नाही. त्यातही वांगी (Brinjal) हा अनेकांसाठी अत्यंत नावडता पदार्थ म्हटले तरी हरकत नाही. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? ही वांगीच (Brinjal) तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चौरस आहार असणे आणि मुख्य म्हणजे त्याच्या जोडीला व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे, बहुतेक लोकांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कॅलरी बर्न करण्यापेक्षा जास्त कॅलरी वापरणे.

जास्त कॅलरीजचे सेवन केल्यास ते शरीरात चरबीच्या रूपात जमा होऊ लागते आणि लठ्ठपणा झपाट्याने वाढू लागतो. अशा वेळी जर वजन कमी करायचे असेल, तर शरीर निरोगी राहील अशा भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. वांगी ही एक अशी भाजी आहे जिचा वापर लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी सहज करता येतो.

वांग्यातले पोषक तत्त्व : वांग्यात कॅलरीजचे प्रमाण अल्प असते. 100 ग्रॅम वांग्यामध्ये 24 कॅलरीज, 4 ग्रॅम कर्बोदके, 1.5 ग्रॅम फायबर, 1.4 ग्रॅम प्रथिने असतात. शिवाय चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असते.

वांगी खाण्याचे फायदे

वांगी त्वचा आणि हाडांसाठीदेखील खूप उपयुक्त आहेत.
वांगे तुमची भूक शांत करते. शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यासाठी या भाजीमध्ये मर्यादित कॅलरीज असतात ज्यामुळे वजन नियंत्रित राहते.
वांग्याच्या सेवनाने रक्तदाब सहज नियंत्रित ठेवता येतो. सोडियम युक्त वांगी बीपीच्या रुग्णांवर औषधाप्रमाणे काम करतात.
वांग्यात नसुनिन नावाचे रसायन असते जे शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. इतर भाज्यांपेक्षा ते जास्त फायदेशीर आहे.
फायबरयुक्त वांगी बद्धकोष्ठतेपासून आराम देतात आणि शरीर निरोगी ठेवतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखर वाढण्याचा धोका नाही. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे आता वांग्याला नाक मुरडणे सोडून द्या.

-हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news