Human Organ Donation : हृदयापासून हाडांपर्यंत… तिने सगळेच दान केले | पुढारी

Human Organ Donation : हृदयापासून हाडांपर्यंत... तिने सगळेच दान केले

मुंबई : जगात कोण कधी कुणाच्या कामी येईल, सांगता येत नाही. (Human Organ Donation) एखाद्याच्या मदतीला आपण धावून गेल्याचे समाधान वेगळेच असते. त्यातल्या त्यात एखाद्याचे प्राण वाचवण्याचे पुण्य तर आपल्याला कृतकृत्य करून जाते. मुंबईत सध्या अशाच दानशूर महिलेची चर्चा आहे. (Human Organ Donation) कामासाठी, रोजीरोटीसाठी सतत धावणार्‍या मुंबईकरांना याची फार खबरबात नसेल. मात्र, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये एका महिलेच्या दानशूरतेची सध्या चांगलीच चर्चा आहे. भारतभेटीवर आलेल्या या स्पॅनिश महिलेने चक्क पाच जणांना जीवनदान दिले.

जसलोक हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरू होते.(Human Organ Donation)  डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. नंतर महिलेल्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर तिचे बहुतांश अवयव दान करण्यात आले. यामुळे चार भारतीय नागरिक आणि लेबनॉनच्या एका नागरिकाला जीवदान मिळाले. टेरेसा मारिया फर्नांडिज असे या 67 वर्षीय स्पॅनिश महिलेचे नाव. भारत भ्रमंतीवर आलेली असताना मुंबईत तिला हेमोरिजिक स्ट्रोक झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जसलोक हॉस्पिटलमध्ये एवढे दिवस उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. अखेर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. तोपर्यंत तिचे नातेवाईक मुंबईत दाखल झाले होते. या स्पॅनिश महिलेची मुलगी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझ्या : करायचे आहेत, ही आईची इच्छा होती, असे महिलेच्या मुलीने सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मिळून महिलेचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार, महिलेचे फुप्फुस, हृदय, आतडे भारतीय रुग्णांना दान केले. महिलेचे हृदय लेबानानच्या नागरिकाला दान करण्यात आले. हाडेदेखील दान केली.

मुंबईतल्या 54 वर्षीय डॉक्टरला या महिलेचे यकृत दान करण्यात आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. नानावटी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली. ‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ असे म्हणतात त्याचा खराखुरा प्रत्यय या स्पॅनिश महिलेने आणून दिला.

हेही वाचा 

Robot : जगातील पहिला अनोखा कॅफे रोबोच करणार सगळी कामे

Space : ५० हजार वर्षांत प्रथमच अंतराळात अनोखे द़ृश्य

Back to top button