lock : … म्हणून कुलपाच्या तळाशी असते छोटेसे छिद्र | पुढारी

lock : ... म्हणून कुलपाच्या तळाशी असते छोटेसे छिद्र

मुंबई : जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण कधीही विसरत नाही ती म्हणजे घराच्या दरवाजाला (lock) कुलूप घालणे. घराच्या सुरक्षेसाठी दरवाजा कुलूपबंद (lock) करणे महत्त्वाचे आहे; मात्र तुम्ही कधी एखादे कुलूप जवळून पाहिले आहे का? त्याच्या की- होलसोबत एक छोटे छिद्रदेखील असते. हे छिद्र असण्यामागचे नेमके कारण काय? ते जाणून घेतल्यानंतर तुम्हीही तुम्ही थक्क व्हाल.

ज्याप्रमाणे कुलूप आपल्या घराचे रक्षण करते त्याचप्रमाणे त्यावर असलेले लहान छिद्र कुलपाच्या सुरक्षिततेसाठी काम करते. घराच्या बाहेर कुलूप बर्‍याचवेळा लटकलेले असते. परिणामी काही वेळा पाणी त्यामध्ये शिरते. त्यामुळे हे लॉक आतमधून गंजण्याची शक्यता असते. मात्र, हे छिद्र कुलपाला गंजण्यापासून वाचवते आणि तुमचे कुलूप वर्षांनुवर्षे टिकते. कुलपाखालील हे छिद्र खूप विचार करून बनवण्यात आले आहे.

जेव्हा कोणत्याही कारणाने कुलपामध्ये पाणी भरते, तेव्हा ते पाणी कुलपाच्या खाली असलेल्या छोट्या छिद्रातून बाहेर येते. यामुळे आत गंज धरत नाही. हे छिद्र कुलपावर नसेल तर आणि कुलपामध्ये पाणी भरले तर पाणी बाहेर पडायला जागा राहणार नाही आणि कुलूप खराब होईल. तसेच, कुलूप जुने होत जाते तसतसे ते काम करणे थांबवते. काहीवेळा असे होते की किल्लीच नीट काम करत नाही. अशा वेळी तुम्ही त्या छोट्या छिद्राच्या मदतीने कुलपाच्या आत तेलपाणी करू शकता. त्यामुळे तुमचे कुलूप आणि किल्ली वर्षांनुवर्षे काम करते.

.हेही वाचा 

Ice and Snow Festiva : चीनच्या हार्बिन शहरात बर्फाची नवलाईची नगरी

Robot : जगातील पहिला अनोखा कॅफे रोबोच करणार सगळी कामे

Back to top button