![डायमंड क्रॉसिंग! जगातील एकमेव असा हा भारतातील रेल्वे मार्ग](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2FDiamond-Crossing.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : नागपूर हे शहर देशाच्या केंद्रभागी आहे. त्यामध्येही तेथील 'डायमंड क्रॉसिंग' हे ठिकाण तर देशाचा मध्यबिंदू असावा असेच आहे. याच ठिकाणी उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम असे रेल्वे मार्ग एकमेकांना भेदून जातात. दिल्ली-चेन्नई असा उत्तर-दक्षिणेचा रेल्वेमार्ग आणि कोलकाता-मुंबई असा पूर्व-पश्चिमेचा रेल्वेमार्ग याठिकाणी एकमेकांना भेदतो. अशा प्रकारचे ठिकाण जगात एकमेव असल्याचे म्हटले जाते व ते भारतातच आहे!
हेही वाचा