मोठ्यांपेक्षाही बाळांची इम्युन सिस्टीम मजबूत | पुढारी

मोठ्यांपेक्षाही बाळांची इम्युन सिस्टीम मजबूत

पुढारी ऑनलाईन डेस्क

सर्वसामान्यपणे सर्व माता-पित्यांना आपल्या बाळाची ‘इम्युन सिस्टीम’ कमजोर असून, त्याला संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे वाटत असते. मात्र, यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार, अपेक्षेपेक्षाही बाळांची इम्युन सिस्टीम जास्त मजबूत असते. यामुळे ते व्हायरस अथवा बॅक्टेरियांविरुद्ध लढण्याच्या बाबतीत वयस्कानांही मात देऊ शकतात. (Baby’s Immune System)

अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी’च्या इरविंग मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी यासंबंधीचे संशोधन केले आहे. या संशोधनातून लहान मुलांना कोव्हिड-19 चा संसर्ग कमी प्रमाणात का होतो? याचेही उत्तर मिळते. कोलंबिया युनिव्हर्सिटीतील डिपार्टमेंट ऑफ मायक्रोलॉजी अँड इम्युनोलॉजीच्या प्रो. डोना फार्बर यांनी सांगितले की, लहान मुले आणि वयस्कांमधील इम्युन सिस्टीमची ज्यावेळी तुलना केली जाते, त्यावेळी लहानग्यांची इम्युन सिस्टीम कमकुवत आणि अविकसित असल्याचे मानले जाते. मात्र, हे खरे नाही. (Baby’s Immune System)

डोना फार्बर व त्यांच्या पथकाने संशोधनात नव्या रोगजनकाच्या (पॅथोजन) विरोधात प्रतिरक्षा प्रणाली आणि त्याला नष्ट करण्याची क्षमतेचा अभ्यास केला. इन्फ्लूएंजा आणि रेस्पिरेटरी सिंकाईटियल व्हायरसमुळे वयस्कांच्या तुलनेत लहान मुलांना फुफ्फुसांसंबंधीचे अनेक आजार होत असतात. याचे कारण म्हणजे लहान मुले प्रथम अशा व्हायरसच्या विळख्यात सापडलेली असतात. मात्र, त्यानंतर आपल्या इम्युन सिस्टीमच्या मदतीने ते वयस्कांच्या तुलनेत जास्त वेगाने या आजारांवर मात करतात.

हेही वाचा

Back to top button