भारतात नव्हे, ‘इथे’ आहे सर्वात महागडे पेट्रोल | पुढारी

भारतात नव्हे, ‘इथे’ आहे सर्वात महागडे पेट्रोल

हाँगकाँग : पेट्रोल आणि डिझेलचे भाव ‘वाढता वाढता वाढे’ अशा थाटात वाढतच चालल्याने लोक हैराण होतात. आपल्याकडे तर पेट्रोलने शंभरी पार केलेली आहे. मात्र, पेट्रोल आपल्याकडेच महाग मिळते असे नाही.

पेट्रोलच्या सर्वाधिक किमती हाँगकाँगमध्ये पाहायला मिळतात. तिथे पेट्रोलचा दर (भारतीय चलनात) तब्बल 190 रुपये प्रतिलिटर इतका आहे! सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएलामध्ये असून तिथे पेट्रोलचा दर 1 रुपया 86 पैसे इतका आहे.

इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ईआययू)कडून याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्याठिकाणी पेट्रोल सर्वात महाग आहे अशा दहा ठिकाणांची यामध्ये माहिती असून या ‘टॉप टेन’मध्ये भारत नाही हे विशेष! ईआययूकडून याबाबतची पाहणी 16 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2021 दरम्यान करण्यात आली होती.

याच काळात एक लिटर पेट्रोलचा दर सुमारे 21 टक्क्यांनी वाढला होता. या यादीत नेदरलँडमधील अ‍ॅम्स्टरडॅम शहर दुसर्‍या स्थानावर असून तिथे पेट्रोलचा दर 164.03 रुपये प्रतिलिटर आहे. तिसर्‍या स्थानावर नॉर्वेचे ओस्लो शहर असून तिथे पेट्रोल 155 रुपये प्रतिलिटर आहे. जगातील सर्वात महागडे शहर ठरलेल्या इस्रायलच्या तेल अवीव शहरात पेट्रोलचा दर 151 रुपये प्रतिलिटर आहे.

Back to top button