Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन लाभदायक | पुढारी

Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन लाभदायक

नवी दिल्ली : आरोग्यासाठी गूळ चांगलाच असतो हे सर्वांना माहीत असते. अनशा पोटी गूळ खाल्ल्यास 4 फायदे होतात, असे आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक रात्री जेवल्यानंतर गूळ खातात. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. मात्र, सकाळी अनशा पोटी गूळ खाल्ल्यावर कोमट पाणी प्यायल्यास त्याचेही आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. (Health Tips)

हे फायदे असे… रक्तदाब नियंत्रणात राहतो : रक्तदाब नियंत्रणासाठी गूळ प्रभावी ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम आणि फॉस्फरस आढळते, हे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. गुळाबरोबर आल्ले सेवन केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो.

रक्त साफ होते : सकाळी अनशा पोटी गूळ खाऊन कोमट पाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होते. त्यामुळे नवीन रक्त तयार होते. हृदयरोग होण्याचा धोका दूर ठेवण्यासही गुळाच्या सेवनाचा फायदा होता.

शरीराला मिळते ताकद : गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते. दिवसभराचा थकवा दूर होण्यासही मदत होते. शरीरात ऊर्जा पातळी कायम राहते आणि ती कमी होत नाही.

पचनसंस्था मजबूत होते : ज्या लोकांना आहार सहजपणे पचवण्यात अडचणी येतात त्यांनी गूळ आणि गरम पाणी सेवन करावे. यामुळे बद्धकोष्ठता, पोटात वायू होणे, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. (Health Tips)

 

हेही वाचा : 

Back to top button