ए. वाय. पाटलांनी भोगावती कारखान्यात नोकरभरतीचा बाजार मांडला; सदाशिराव चरापलेंचा आरोप | पुढारी

ए. वाय. पाटलांनी भोगावती कारखान्यात नोकरभरतीचा बाजार मांडला; सदाशिराव चरापलेंचा आरोप

राशिवडे, पुढारी वृतसेवा : राष्ट्रवादीचे नेते ए.वाय.पाटील यांनी भोगावती साखर कारखान्यामध्ये नोकरभरतीचा बाजार मांडला. त्यांच्यामुळे लाखोंचा घोडेबाजार झाला. सुसंस्कृत भोगावतीला त्यांनीच गालबोट लावले. त्यांच्याकडेच बिनविरोध धुरा दिल्यानेच ही स्थिती उद्धभवली, असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

चरापले म्हणाले की, भोगावतीच्या कारभारात बाह्य शक्तींचा हस्तक्षेप झाल्याने भोगावतीचे वाटोळे झाले. याचा पंचनामा आम्ही सभासदांसमोर करणार असून भोगावतीच्या निवडणुकीचे बिनविरोधचे ढोंग करण्यात आले. सध्याच्या सतारुढ मंडळींनी सतेची सूत्रे हातात घेतल्यानंतर दर वर्षी ८० कोटी ने कर्ज वाढवले. कारखान्याचे आणि सभासदांचे हे गुन्हेगार असताना आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रकार भोगावतीच्या कार्यक्षेत्रात घडला, असा आरोप स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी केला. यावेळी भाजपचे हंबीरराव पाटील, नामदेकाका पाटील, शिवसेनेचे अजित पाटील, निवास पाटील स्वाभिमानीचे जनार्दन पाटील यांचेसह सर्व उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button