प्रिमॅच्युअर बाळांसाठी वरदान ठरणार कृत्रिम प्लॅसेंटा

प्रिमॅच्युअर बाळांसाठी वरदान ठरणार कृत्रिम प्लॅसेंटा
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगभरात दरवर्षी लाखो प्रिमॅच्युअर बाळांना आईच्या गर्भासारखे वातावरण देणे शक्य न झाल्याने त्यांना वाचवले जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांच्या संयुक्त विद्यमाने फिलाडेल्फियातील लहान मुलांच्या रुग्णालयाने कृत्रिम प्लॅसेंटा तयार केले आहे. हे कृत्रिम प्लॅसेंटा नियोजित वेळेपेक्षा आधी जन्मणार्‍या मुलांसाठी वरदान ठरू शकते. या उपकरणाला एक्सटेंड सिस्टीम असे म्हटले जाते.

संशोधकांनी काही नवजात अर्भकांवर याचे परीक्षण केले. त्यांना चार आठवड्यांपर्यंत या प्लॅसेंटामध्ये ठेवले गेले होते. ज्यावेळी नियोजित वेळेपेक्षा लवकर जन्मलेल्या या अर्भकांना प्लॅसेंटामध्ये ठेवण्यात आले, त्यावेळी त्यांची स्थिती आईतील गर्भात असल्याप्रमाणेच राहिली आणि हा संशोधकांसाठी खूप महत्त्वाचा घटक होता.

28 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या अर्भकांना या प्लॅसेंटामध्ये ठेवले जाणार आहे. सध्या हे प्लॅसेंटा प्रायोगिक तत्त्वावर असून लवकरच त्याच्या प्रत्यक्ष निर्मितीला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news