Roman Temple : रोमन मंदिरात दिला जात होता पक्ष्यांचा बळी | पुढारी

Roman Temple : रोमन मंदिरात दिला जात होता पक्ष्यांचा बळी

रोम : पोम्पेई या रोमन शहरातील इसिस देवतेच्या मंदिरात करण्यात आलेल्या उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना पक्ष्यांच्या मांसाच्या मेजवानीचे अवशेष सापडले आहेत. या पक्ष्यांचा इसिस या देवीसमोर बळी दिला जात असे. त्यानंतर त्यांच्या मांसाची मेजवानी होत असे. (Roman Temple)

इसिसच्या पूजा विधीमधील पक्ष्यांचे महत्त्व यावरून दिसून आले. ही मुळात इजिप्शियन देवी इसवी सनाच्या पहिल्या शतकात रोमन समाजातही तिची पूजाअर्चा केली जाऊ लागली. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑस्टियोआर्कियोलॉजी’मध्ये देण्यात आली आहे. इटलीच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेरिटेज सायन्समधील चियारा कोर्बिनो यांनी सांगितले की असा बळी रोजच दिला जात असे. एका दिवसात तीन पुरोहित असा बळीचा विधी पार पाडत. पोम्पेई हे एक संपन्न रोमन शहर होते. इसवी 79 मध्ये माऊंट वेसुवियस या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या शहराचा र्‍हास झाला आणि हे शहर राखेखाली गाडले गेले. त्याच्यावर वीस फुटांचा राखेचा स्तर साचला होता. सुरुवातीच्या रोमन साम—ाज्याच्या काळात हे शहर पुन्हा शोधून वसवण्यात आले. (Roman Temple)

तत्पूर्वी इसवी सन 62 मधील भूकंपात इसिसच्या मंदिराचे नुकसान झाले होते व त्यानंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. या जीर्णोद्धारानंतर व ज्वालामुखीच्या इसवी सन 79 मधील उद्रेकापूर्वी कधी तरी ही पक्ष्यांच्या मांसाची मेजवानी झाली असावी. याठिकाणी आठ कोंबड्या, एक हंस, कबुतर तसेच एका डुकराच्या मांसाचेही अवशेष सापडले आहेत. या पक्ष्यांचा बळी देऊन नंतर त्याचे मांस शिजवले जात असे. हे शिजवलेले मांस नंतर मंदिरातील पुरोहित खात असत. ‘इसिस’ या देवतेला पक्ष्यांप्रमाणे पंख दाखवले जातात. इजिप्तमध्ये तिला ‘अ‍ॅसेट’ किंवा ‘इसेट’ असे म्हटले जात असे. त्याचा अर्थ ‘महान माता’ असा होतो.

हेही वाचा; 

Back to top button