Tyrannosaurus rex : पृथ्वीवर वावरले १.७ अब्ज टी-रेक्स डायनासोर | पुढारी

Tyrannosaurus rex : पृथ्वीवर वावरले १.७ अब्ज टी-रेक्स डायनासोर

न्यूयॉर्क : ‘डायनासोर’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर हिंसक, आक्रमक असे टायरॅनोसॉरस रेक्स किंवा टी-रेक्स डायनासोरच उभे राहतात.‘ ज्युरासिक पार्क’सारख्या चित्रपटांमुळे असा प्रभाव पडलेला आहे. आता संशोधकांनी असे किती टी-रेक्स पृथ्वीवर वावरले त्याची गणती केली आहे. त्यानुसार या पृथ्वीतलावर एकूण 1.7 अब्ज टी-रेक्स वावरल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Tyrannosaurus rex)

पृथ्वीच्या इतिहासात असे किती टी-रेक्स होऊन गेले याची यापूर्वीही गणती झाली होती. आता एका नव्या गणतीमधून हा 1.7 अब्जाचा आकडा समोर आला आहे. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले होते की सुमारे 2.5 अब्ज टी-रेक्स पृथ्वीवर 68 ते 65.5 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळात अस्तित्वात होते. मात्र, आता याबाबत एक नवे संशोधन करण्यात आले. (Tyrannosaurus rex)

त्याची माहिती 18 एप्रिलला ‘पॅलिओंटोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. या नव्या संशोधनात जुन्या आकडेवारीला आव्हान देण्यात आले. खरा आकडा हा 1.7 अब्जाच्या जवळ जाणारा असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. इव्हा ग्रीबेलर यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. जर्मनीच्या मैंझ येथील जोहान्स गुटेनबर्ग युनिव्हर्सिटीमधील त्या इव्होल्युशनरी इकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी याबाबतच्या नव्या मॉडेलची माहिती दिली.

संबंधित बातम्या

हेही वाचा;

Back to top button