bear : झाडावर चढणारी, पोटावर पिशवी असणारी ‘अस्वलं’ | पुढारी

bear : झाडावर चढणारी, पोटावर पिशवी असणारी ‘अस्वलं’

मेलबोर्न : पृथ्वीवर हजारो, लाखो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या अनेक प्राण्यांचे अस्तित्व त्यांच्या जीवाश्मांच्या रूपाने कायम राहिलेले आहे. अशा जीवाश्मांच्या शोधानंतर हे प्राणी कसे होते याची माहिती मिळत असते. त्यामध्ये त्यांची जीवनशैली, आहार, शरीररचना आणि विकासक्रमही समजत असतो. एकप्रकारे असे जीवाश्म म्हणजे जणू काही बायोस्कोप असतात ज्यामध्ये डोकावून आपण हजारो वर्षांपूर्वीच्या त्यांच्या जगात पोहोचतो. आता अशाच एका प्रागैतिहासिक काळातील अस्वलासारख्या प्राण्याचे जीवाश्म सापडले आहे. त्यावरून दिसून येते की हे प्राणी झाडावरही लिलया चढून जात होते. त्यांच्या पोटावर कांगारूंसारखी पिशवीही होती! (bear)

‘जर्नल ऑफ पॅलिओंटोलॉजी’मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या जगप्रसिद्ध ‘रिव्हरस्लेघ वर्ल्ड हेरिटेज एरिया’ मध्ये या महाकाय अस्वलासारख्या प्राण्याचे दीड कोटी वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले आहे. सध्या पिल्लांसाठी पोटावर पिशवी असलेले जसे प्राणी पाहायला मिळतात, तसाच हा प्राणी होता. (bear)

झाडावर राहणार्‍या अशा प्राण्यांना ‘निंबाडोन’ असे म्हटले जाते. या प्राण्याचे वजन सुमारे 70 किलोग्रॅम होते. हा ऑस्ट्रेलियातील आतापर्यंतचा झाडावर राहणारा सर्वात मोठ्या आकाराचा सस्तन प्राणी ठरला आहे. त्याचा संबंध ‘डिप्रोटोडोन्टोइडस्’ या कुळाशी आहे. या कुळातच अडीच टन वजनाच्या महाकाय ‘ड्रिप्रोटोडोन’ या प्राण्याचाही समावेश आहे. आधुनिक प्राण्यांमध्ये निंबाडोन हा बर्‍याच अंशी ‘वुम्बॅट’शी मिळताजुळता आहे. मात्र, त्याचा आकार पाहता तो आग्नेय आशियात आढळणार्‍या तपकिरी अस्वलांसारखा आहे. दीड कोटी वर्षांपूर्वी हे निंबाडोन ऑस्ट्रेलियाच्या वर्षावनात वावरत होते.

हेही वाचा; 

Back to top button