shark : ‘सैतानी’ शार्क माशाचा शोध | पुढारी

shark : ‘सैतानी’ शार्क माशाचा शोध

सिडनी : खोल समुद्रामध्ये अत्यंत भयावह रूप असलेल्या शार्कच्या एका प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. विचित्र दिसणार्‍या या शार्कचे रूप ‘सैतानी’ असल्याचे अनेकांना वाटते. त्याचे डोळेही चमकदार पांढर्‍या रंगाचे आहेत. यापूर्वी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या तटावर याच प्रजातीच्या एका मादी शार्कचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, समुद्राच्या अथांग खोलीत वावरत असलेला असा शार्क आता प्रथमच दिसून आला आहे.

सुरुवातीच्या काळात या भयानक शार्कच्या प्रजातीबाबत गोंधळ होता. ही एक नवीच प्रजाती आहे असे म्हटले गेले. आता याबाबतच्या नव्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ फिश बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तिला ‘अ‍ॅप्रिस्टरस ओव्हीकोरगेटस’ असे नाव देण्यात आले आहे. ‘ओव्ही’ या अंड्यासाठी असलेल्या लॅटिन शब्दावरून हे नाव ठेवलेले आहे. संशोधक विल व्हाईट यांनी सांगितले की समुद्रात अतिशय खोलवर वावरणारे जलचर हे असे विचित्र दिसणारेच असतात.

न्यू कॅलेडोनिया आणि पापुआ न्यू गिनीमध्येही अशीच ‘अ‍ॅप्रिस्टरस नाकायी’ नावाची एक प्रजाती आहे. ‘अ‍ॅप्रिस्टरस’ ही कॅटशार्कच्या कुळातील प्रजाती आहे. त्यांना सर्वसामान्यपणे ‘घोस्ट’ किंवा ‘डेमन कॅटशार्क’ म्हणून ओळखले जाते. शार्कच्या सुमारे 40 ज्ञात प्रजाती आहेत. त्यापैकी या सर्वात विचित्र अशा प्रजाती आहेत. यामधील काही पिल्लांना थेट जन्म देतात तर काही अंडी घालतात. त्यांच्या अंड्यांच्या पिशव्याही अनोख्याच असतात.

संबंधित बातम्या

-हेही वाचा 

Butterfly : फुलपाखराला ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’च्या खलनायकाचे नाव

नाशिक @40.2 : हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

OLED : भारतीय वैज्ञानिकांनी केले ‘ओएलईडी’साठी महत्त्वाचे संशोधन

Back to top button