OLED : भारतीय वैज्ञानिकांनी केले ‘ओएलईडी’साठी महत्त्वाचे संशोधन | पुढारी

OLED : भारतीय वैज्ञानिकांनी केले ‘ओएलईडी’साठी महत्त्वाचे संशोधन

भोपाळ : भारतीय वैज्ञानिकांनी कार्बनिक अणूंचा एक नवा परिवार तयार केला आहे, जो निकट-अवरक्त (एनआयआर) रेंजमध्ये प्रकाशाचे उत्सर्जन करण्यास सक्षम आहे. त्यापासून वेगवेगळ्या वापरासाठी कार्बनिक प्रकाश उत्सर्जक डायोड (OLED) च्या उपयोगाच्या अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.

भोपाळमधील भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (आयआयएसईआर) च्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.(OLED) कार्बनिक प्रकाश उत्सर्जक डायोड, ज्याला कार्बनिक इलेक्ट्रोल्युमिनिसेंट डायोडच्या रूपातही ओळखले जाते, एक प्रकाश उत्सर्जक डायोड आहे. त्यामध्ये उत्सर्जक इलेक्ट्रोल्युमिनिसेंट स्तर हा एक कार्बनिक घटकाची फिल्म असते जी विद्युत प्रवाहाच्या प्रतिक्रियेत प्रकाशाचे उत्सर्जन करते. नायट्रेशनचा उपयोग करून संशोधकांना एनआयआर उत्सर्जनबरोबर इलेक्ट्रॉन-न्यूनता असलेला स्थिर अणू प्राप्त करण्यास यश मिळाले. त्यांचे म्हणणे आहे की हा प्रयोग अद्वितीय आहे.

एनआयआर-उत्सर्जक ओएलईडीचा विकास जगभरात आव्हानात्मक राहिलेला आहे. प्रकाश उत्सर्जक डायोड (एलईडी) हे छोटे प्रकाश उत्सर्जक उपकरण असतात ज्यांचा वापर सर्वसाधारणपणे टेलिव्हीजन स्क्रीन, गॅझेट डिस्प्लेसारख्या वस्तूंमध्ये होतो. ते पारंपरिक फिलामेंट बल्बपेक्षा वेगळे असतात. ज्यावेळी एलईडीमधून वीज इलेक्ट्रॉन्सच्या रूपात वाहते त्यावेळी ती प्रकाश उत्सर्जित करते. एलईडीचेच एक रूप ‘ओएलईडी’ आहे. त्यामध्ये प्रकाश उत्सर्जक सामग्रीच्या रूपात कार्बनिक अण असतात.

-हेही वाचा

Eyes : ‘या’ कारणांमुळे फडफडतात डोळे! 

श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा अमरिशभाई पटेल 

 

 

Back to top button