Butterfly : फुलपाखराला ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’च्या खलनायकाचे नाव | पुढारी

Butterfly : फुलपाखराला ‘लॉर्ड ऑफ रिंग्ज’च्या खलनायकाचे नाव

लंडन : संशोधकांनी फुलपाखरांच्या (Butterfly) एका नव्या कुळाला ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीतील खलनायकाचे म्हणजेच ‘सौरोन’चे नाव दिले आहे. या फुलपाखरांच्या (Butterfly) नारंगी पंखांवरील काळ्या वर्तुळांमुळे हे नाव देण्यात आले आहे. ते जेआरआर टॉकिन्सच्या कादंबर्‍यांमधील सर्व काही पाहू शकणार्‍या डोळ्यांची आठवण करून देणारी आहेत.

लंडनमधील ‘द नॅचरल हिस्टरी म्युझियम’मधील तज्ज्ञांना वाटते की हे अनोखे नावच या फुलपाखराकडे (Butterfly) लोकांचे लक्ष वेधून घेईल. त्यामुळे या प्रजातीबाबत आणखी संशोधन होईल. या सौरोना जीनसमध्ये फुलपाखरांच्या दोन प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सौरोना ट्रँग्युलर व सौरोना ऑरिगेरा यांचा समावेश आहे. भविष्यात अशा आणखीही काही प्रजातींचा यामध्ये समावेश होऊ शकेल असे संशोधकांना वाटते. म्युझियममधील फुलपाखरांच्या विभागाचे क्युरेटर डॉ. ब्लँका ह्युर्टास यांनी हे नाव सुचवले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘सिस्टेमेटिक एंटोमोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

.हेही वाचा

झाडांच्या पुनर्रोपणाला वणव्याची झळ; सिंहगड रस्ता उड्डाणपुलासाठी काढली 180 झाडे

OLED : भारतीय वैज्ञानिकांनी केले ‘ओएलईडी’साठी महत्त्वाचे संशोधन

Back to top button