Global warming : ग्लोबल वॉर्मिंगमुळे इटलीत पाण्याचा ठणठणाट! | पुढारी

Global warming : ग्लोबल वॉर्मिंगमुळे इटलीत पाण्याचा ठणठणाट!

क्रेमोना : पो ही इटलीतील सर्वात मोठी नदी. पण अलीकडे जलवायू परिवर्तन आणि ग्लोबल वार्मिंगचा (Global warming) या नदीला चांगलाच फटका बसला असून, ही नदी आता चक्क 75 टक्के कोरडी पडली आहे. बोल्जानो क्लायमेट अँड एन्व्हार्यन्मेंट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मानवनिर्मित कारणेच याला अधिक कारणीभूत आहेत.

पो नदीत पाण्याचा इतका ठणठणाट असण्याची मागील 30 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. नदीच्या 75 टक्के भागातील पाणी यापूर्वीच आटून गेले असून आजूबाजूच्या एल्प्स पर्वतरांगांवर (Global warming) बर्फ नावाला देखील बाकी राहिलेले नाही, त्याचा देखील हा फटका असल्याचे सांगण्यात येते. पो नदीची लांबी 652 किलोमीटर इतकी आहे.

या नदीचा जलस्तर मागील वर्षांपासून बराच घटत चालला आहे. यंदा एप्रिल महिन्यातच या नदीने 30 वर्षांतील निचांकी तळही (Global warming) पार केला आहे. या कोरड्या ठणठणाटामुळे इटलीतील शेतकर्‍यांसमोर आता अस्मानी संकट उभे ठाकले आहे. इटलीतील सर्वाधिक शेती ही नदीच्या किनार्‍यालगतच असून याला फूड व्हॅली, असे संबोधले जाते; पण आता पाणीच नसल्याने शेतकर्‍यांसमोर यक्षप्रश्न असणार आहे. याशिवाय, इटलीत मासेमारी भरपूर चालते. त्यालाही यंदा मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button