Wrestlers Protest : बृजभूषण यांच्यावर ‘पोक्सो’ चा गुन्हा; न्यायालयीन सुनावणीनंतर दिल्ली पोलिसांची कारवाई | पुढारी

Wrestlers Protest : बृजभूषण यांच्यावर 'पोक्सो' चा गुन्हा; न्यायालयीन सुनावणीनंतर दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: वृत्तसंस्था : Wrestlers Protest भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कथित आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलिस स्थानकात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. पहिला एफआयआर अल्पवयीन मुलीद्वारे करण्यात आलेल्या आरोपसंदर्भात आहे. याच प्रकरणात पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दूसरा एफआयआर महिला कुस्तीपटूंनी दिलेल्या तक्रारीच्या नोंदवण्यात आधारे आला आहे. दोन्ही प्रकरणांत गंभीर दखल घेण्यात आली आहे.

बृजभूषण यांच्याविरोधात : Wrestlers Protest महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिस बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली होती, त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. सिंह यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सोमवारी (२४ एप्रिल) कुस्तीगिरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

यावर शुक्रवारी (२८ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिसांकडून आजच बृजभूषण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यानुसार ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. Wrestlers Protest

या प्रकरणावर कुस्तीगीर विनेश म्हटले आहे. फोगटने बोलताना सांगितले की, पहिल्या दिवशीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. पण, त्यासाठी सहा दिवस लागले. ही लढाई गुन्हा दाखल करण्यापुरती मर्यादित नाही. त्यांच्याविरोधात आधीच ८५ गुन्हे दाखल आहेत. पण, त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग, आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांना सर्व पदांवरून हटवत, तुरुंगात टाकले पाहिजे.

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाविरुद्ध बृजभूषण यांची ‘भावनिक’ खेळी

बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी (दि. २७) एक व्हिडीओ शेअर करत म्हंटले आहे, मित्रांनो, ज्या दिवशी मी काय मिळवले किंवा काय गमावले याचे आत्मपरीक्षण करेन आणि मला वाटेल की माझ्यात लढण्याची ताकद नाही; ज्या दिवशी मला असह्य वाटेल, मी असे जीवन जगणार नाही म्हणून मी मृत्यूची इच्छा करेन, असे जीवन जगण्यापेक्षा मृत्यूने मला आपल्या मिठीत घ्यावे, अशी माझी इच्छा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा :

अहमदनगर जिल्ह्यात सातवाहन ते मध्ययुगीन वसाहतीचे सापडले पुरावे, राज्यातील पाहिलेच उत्खनन

बृजभूषण यांच्यावर कारवाई का होत नाही? भाजपसाठी बनलेत अवघड जागेचं दुखणं

Back to top button