Happy Hormones म्‍हणजे काय ? जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

Happy Hormones म्‍हणजे काय ? जाणून घ्‍या सविस्‍तर

नवी दिल्ली : आपल्या शरीरातील हार्मोन्स फार महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरात अनेक नानाप्रकारचे हार्मोन्स असतात. त्यापैकी एंडोर्फिन, डोपामाईन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन यांना ‘हॅप्पी’ हार्मोन्स ( Happy Hormones ) म्हटले जाते. हे हार्मोन्स आपल्या मनातील आनंदाची भावना, तृप्ती किंवा समाधान यावर प्रभाव टाकत असतात.

सेरोटोनिन हे हार्मोन आपल्या पोटाशी संबंधित असते. हे हार्मोन आपली पचनक्रिया सुद़ृढ ठेवण्यास मदत करते. हे हार्मोन वाढविण्यासाठी सुकामेवा आणि तुपाचे सेवन करू शकता. डोपामाईन हे हार्मोनही फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तुम्हाला तुमचे काम पूर्ण झाले की प्रचंड आनंद होतो. तेव्हा या आनंदाचे कारण आहे ते म्हणजे डोपामाईन हे संप्रेरक. ते वाढल्याने आपल्याला आनंद होतो.

Happy Hormones : योग्य आहारासह व्‍यायाम हवाच

ऑक्सिटोसिन या संप्रेरकामुळे तुमच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते. आपल्या प्रेयसीबद्दल, प्रियकराबद्दल, आई-वडिलांबद्दल जेव्हा प्रेमाचे नाते तयार होते तेव्हा हे हार्मोन तयार होते. तेव्हा आपल्या आयुष्यातील हे हार्मोन हे सर्वात महत्त्वाचे आहे. एंडोर्फिन आपल्या मनाला शांत ठेवण्याचे काम करते. आपल्या मनात अनेकदा नानातर्‍हेचे विचार येत असतात तेव्हा या हार्मोनची वाढ होते. तुम्ही हे हार्मोन्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता. त्यासाठी तुम्ही रोज योग्य व्यायाम, चांगलं खाणं आणि चांगली शांत झोप घेणे आवश्यक असते. मुळात आपल्याला शारीरिक आणि मानसिक शांतता हवी असते तेव्हा या हॉर्मोन्सला वाढविण्यासाठी तुम्ही योग्य आहारासह आणि व्‍यायामहीकरा, असे तज्ज्ञ सांगतात.

Happy Hormones : आहारात करा या पदार्थांचा समावेश

आपल्या आहारात तुम्ही दूध आणि हळदीचाही वापर करून घेऊ शकता. एल्फा लॅक्टालब्युमिनमुळे सेरोटोनिनची निर्मिती होते. याद्वारे तुमचा मूड सुधारतो. तुम्हाला जर का फारच जास्त प्रमाणात जंक फूड खात असाल तर वेळीच थांबवा. आपण कायमच ऐकत आलोय की आपले मूड स्विंग्स होतात याचा अर्थ आपल्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल हे होत असतात. आपण ऐकतो ते अगदी खरं आहे. कारण आपला मूड बनवण्याचे आणि बिघडण्याचे कारण हे आपले शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलावर अवलंबून असतात.

हेही वाचा : 

 

Back to top button