दीर्घायुषी जपानी लोकांचा ‘असा’ असतो आहार… | पुढारी

दीर्घायुषी जपानी लोकांचा ‘असा’ असतो आहार...

टोकियो : जपानी लोकांची ओळख ‘दीर्घायुष्य जगणारे लोक’ अशी आहे. त्यांचे आरोग्य अगदी उतारवयातही चांगले असते. त्यामागे त्यांच्या संतुलित आहाराचे मोठे योगदान आहे. भारतीयांच्या तुलनेत जपानी लोक हे आपल्या आहाराबाबत अत्यंत सतर्क असून त्यांच्या जेवणात 25 टक्के कमी कॅलरीचे अन्न असते. पोषक तत्त्वांच्या बाबतीत जपानी व्यक्ती कधीही तडजोड करत नाहीत.

त्यांच्या जेवणात कॅलरी कमी प्रमाणात असल्यामुळे कोलेस्टेरॉल, हृदयविकाराच्या समस्या, मधुमेह अशा मोठ्या समस्यांना अधिक प्रमाणात सामोरे जावे लागत नाही. जपानी लोकांच्या आहारात माशांचा अधिक समावेश दिसून येतो. या देशात सर्वात जास्त चहा प्यायला जातो; मात्र त्यामध्ये दूध आणि साखर नसून ग्रीन टीचा अधिक वापर करण्यात येतो. ग्रीन टी शरीरातील कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरते.

एका दिवसात 4-5 कप ग्रीन टी पिणार्‍या व्यक्तींमध्ये अकाली मृत्यूचा दर 26 टक्के कमी दिसून येतो असे सिद्ध झाले आहे. यासह ग्रीन टी मेटाबॉलिजम सिस्टीम म्हणजेच चयापचय क्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. तसेच पचनक्रिया चांगली राहते आणि वजन वाढू देत नाही.

जपानी व्यक्तींच्या अधिक जगण्याचे सर्वात महत्त्वाचे रहस्य म्हणजे हिरव्या भाज्या आणि प्लांट बेस्ड फूड. जपानमध्ये मत्स्याहाराशिवाय कमी प्रमाणात मांस खाल्ले जाते. मांस केवळ एखाद्या सणावेळी खाण्यास प्राधान्य देत दोन्ही वेळा जेवणात भाजीला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न केला जातो.

.हेही वाचा 

‘आयईपीएफ’कडून शेअर्स आणि लाभांश कसा मिळवावा?

राजाराम साखर कारखाना निवडणूक : अवैध 29 उमेदवारांचे अपील फेटाळले 

Back to top button