Gold : जंगलात सगळीकडे सोनेच सोने? | पुढारी

Gold : जंगलात सगळीकडे सोनेच सोने?

लिमा : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील सोन्याच्या (Gold) खाणी प्रसिद्ध आहेत. मात्र, या देशातील जंगलाच्या एका छायाचित्राने सर्वांनाच थक्क केले आहे. ते पाहिले की वाटते या जंगलात सर्वत्र सोनेच सोने (Gold) आहे! अर्थातच जसे दिसते तसे नसते!!

हे छायाचित्र पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून टिपण्यात आले आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील सोन्याचे (Gold) छायाचित्र असावे असे ते वाटते. हे छायाचित्र खरे तर नवे नाही. ते 24 डिसेंबर 2020 मध्ये टिपण्यात आले होते.

अंतराळस्थानकावर राहत असलेल्या एका अंतराळवीराने ते टिपले होते. ‘नासा’च्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने म्हटले आहे की सोन्याने भरलेले हे खड्डे म्हणजे वास्तवात अशा पाणथळ जागा आहेत ज्यामध्ये केवळ चिखलच आहे. त्यांच्या आजुबाजूला झाडेझुडपे नाहीत. या छायाचित्राच्या डाव्या बाजूला एखाद्या किड्यासारखी दिसत असणारी इनमबारी नदी आणि तम्बोपता नॅशनल रिझर्व्ह आहे.

संबंधित बातम्या

ही ठिकाणे कायदेशीररीत्या संरक्षित आहेत. अर्थातच हा फोटो थोडा एडिटेड आहे आणि तो एका डिजिटल कॅमेर्‍याच्या सहाय्याने टिपण्यात आला होता. सोन्याच्या उत्पादनाबाबत पेरू देशाचे जगातील स्थान सहावे आहे. मात्र, तिथे अवैध खाणकामाने समस्या निर्माण केल्या आहेत. त्याचा फटका पर्यावरण आणि ‘जगाचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अ‍ॅमेझॉन जंगलाला बसत आहे.

-हेही वाचा

निरक्षर आईसाठी बनवले ‘डिजिटल स्पोकन’ वृत्तपत्र

दीर्घायुषी जपानी लोकांचा ‘असा’ असतो आहार…

 

Back to top button