टोरांटो : चेंडू नव्हे; 30 हजार वर्षांपूर्वीच्या खारीची ममी! | पुढारी

टोरांटो : चेंडू नव्हे; 30 हजार वर्षांपूर्वीच्या खारीची ममी!

टोरांटो : कॅनडामधील पर्माफ्रॉस्टमध्ये म्हणजेच बर्फाच्या स्तरा एक विचित्र वाटणारा फरचा ‘चेंडू’ अलीकडेच सापडला होता. या चेंडूमध्ये पंजे, मांड्याही दिसत होत्या; पण हा कोणता जीव आहे हे कळत नव्हते. आता संशोधनांती समजले आहे की हा चेंडू म्हणजे वास्तवात 30 हजार वर्षांपूर्वीच्या खारीची ममी आहे!

कॅनडाच्या युकॉन प्रांतातील हेस्टर क्रीक येथे काही खाण कामगारांना 2018 मध्ये हा फर बॉल सापडला होता. हा चेंडू म्हणजे ‘आर्क्टिक ग्राऊंड स्क्वेरल’ (युरोसिटेलस पॅरिल) आहे, असे आता दिसून आले. ही प्रजाती खारींपेक्षाही सध्याच्या काळातील ‘गोफर्स’ या बिळात राहणार्‍या व उंदरासारख्या प्राण्यासारखी दिसत होती. विशेष म्हणजे अशा प्रजातीच्या खारी अद्यापही अस्तित्वात असून त्या ही ममी जिथे सापडली त्या परिसरातच आढळतात. हा फरचा चेंडू ज्यावेळी सापडला त्यावेळी तो नमेका काय आहे हे समजलेले नव्हते. आता ग्रँट झाझुला या पॅलेंटोलॉजिस्टनी ही खारीची सुरक्षित राहिलेली ममी असल्याचे म्हटले आहे. एक्स-रेमध्ये तिच्या शरीरातील हाडे व अवयवांची रचना दिसून येते.

.हेही वाचा

Gold : जंगलात सगळीकडे सोनेच सोने?

राज्यातील साखर उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला

Back to top button