Water scarcity : ‘या’ देशात पाणीही प्यावे लागते मोजून-मापून; रेशन तत्त्वावर पाणी वाटप करण्याचा निर्णय

Water scarcity
Water scarcity

ट्यूनिस : पाण्याला लोक गृहितच धरत असतात. मात्र, सध्याच्या काळात पाणीही विकत घेऊन प्यावे लागते हे लोक विसरत आहेत. पाण्याचा अपव्यय करू नये यासंदर्भातील जनजागृती मोहिमा, डिजिटल संदेश आपण अनेकदा पाहिले असतील. पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठा धोका निर्माण होईल. पाणी जपून वापरले नाही तर भविष्य कठीण आहे. यासारख्या गोष्टी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, मात्र अनेकांना अनेकदा सांगूनही पाण्याचा जपून वापर करण्यासंदर्भातील जाणीव झाल्याचे दिसत नाही. त्यामुळेच आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या देशात पाण्याची टंचाई (Water scarcity) निर्माण झालेली असल्याने थेट कोटा सिस्टीम लागू करण्यात आली आहे. ट्युनिशिया या देशामध्ये आपल्याकडे रेशनला लागू करण्यात आलेल्या कोट्याप्रमाणे पाण्याचा कोटा लागू करण्यात आला आहे.

या देशामध्ये पिण्याचे पाणी (Water scarcity) अगदी थेंब अन् थेंब मोजून मापून दिले जाते. पुढील 6 महिन्यांसाठी या देशात ड्रिंकिंग वॉटर कोटा लागू करण्यात आला आहे. येथे शेतीसाठी पाणी मिळणार नाही, असे सांगण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणी वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ट्युनिशिया सरकारच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक महिन्यांपासून देशात दुष्काळ आहे.

देशातील बंधार्‍यांमधील पाण्याची पातळी 30 टक्क्यांवर गेली आहे. मागील वर्षी देशात कमी पाऊस पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी मंत्रालयाने सांगितले. सध्याची दुष्काळाची परिस्थिती पाहून ट्युनिशिया सरकारने रेशन तत्त्वावर पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच देशामध्ये कार धुण्यावर आणि झाडांना ताजे पाणी (रिसायकल न केलेले) घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी साफसफाईसाठी पाणी वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news