Train : सर्वात वेगवान ट्रेन धावते ‘हवेत’! | पुढारी

Train : सर्वात वेगवान ट्रेन धावते ‘हवेत’!

शांघाय : जगातील सर्वात वेगवान ट्रेन (Train) फक्त अमेरिका, जपानमध्येच नाहीत तर भारताच्या शेजारील देश चीनमध्येही आहेत. चीनमधील शांघाय मॅग्लेव्ह नावाची ट्रेन शांघायच्या पुडोंग विमानतळापासून ते लाँगयांग रोड स्टेशनपर्यंत जोडलेली आहे. या ट्रेनचा कमाल वेग 460 कि.मी./तास आहे. या सुपर स्पीड ट्रेनद्वारे नोएडा आणि अलाहाबाद दरम्यानचे 700 कि.मी.चे अंतर अवघ्या दीड तासात पूर्ण करता येते. या   ट्रॅकच्या या चुंबकीय प्रभावामुळे ट्रेन स्थिर राहते आणि कोणताही आवाज न करता वेगाने धावत राहते.

मॅग्लेव्ह टेक्निक हे मूळचे जर्मनी देशाचे आहे. ही मॅग्लेव्ह ट्रेन (Train)  चीनमध्ये गेल्या जवळपास एक दशकापासून धावत असून आता त्यांनी स्वदेशी बनावटीची 600 कि.मी./तास वेगाने धावणारी मॅग्लेव्ह ट्रेन तयार केली आहे. मात्र, या ट्रेनमधून अद्याप प्रवाशांना प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळेच सर्वात वेगवान ट्रेनचा किताब अजूनही शांघाय मॅग्लेव्ह ट्रेनच्या नावावर आहे. या ट्रेनची लांबी 153 मीटर, रुंदी 3.7 मीटर आणि उंची 4.2 मीटर आहे. यामध्ये एकूण 574 प्रवासी प्रवास करू शकतात.

यामध्ये 3 प्रकारचे कोच आहेत, ज्यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि एंड सेक्शनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावे लागते. चिनी नागरिकांशिवाय परदेशी नागरिकांनाही या ट्रेनमधून प्रवासाचा आनंद घेता येतो. त्यामुळे चीनमध्ये पर्यटनासाठी गेलेले अनेक पर्यटक या ट्रेनमधून प्रवास केल्याशिवाय माघारी परतत नाहीत.

संबंधित बातम्या

.हेही वाचा 

https://pudhari.news/vishwasanchar/491687/husband-complains-to-the-police-after-his-wife-was-bitten-by-a-mosquito/ar

https://pudhari.news/vishwasanchar/490920/iceberg-size-of-los-angeles/ar

Back to top button