लॉस एंजिल्सइतक्या आकाराचा हिमनग | पुढारी

लॉस एंजिल्सइतक्या आकाराचा हिमनग

लंडन : अंटार्क्टिकामध्ये अमेरिकेतील लॉस एंजिल्स शहराच्या आकाराचा एक महाकाय हिमनग आहे. त्याची काही हवाई छायाचित्रे टिपण्यात आली असून त्यावरून या हिमनगाचा मोठा विस्तार दिसून येतो.

या हिमनगाला ‘ए 81’ असे नाव देण्यात आले आहे. ब्रंट आईस शेल्फमधून या हिमनगाचा जन्म झाला होता. 490 फूट जाडीच्या बर्फाच्या स्तरामधून दुभंगून बनलेल्या या हिमनगाचा विस्तार 1550 चौरस किलोमीटर आहे. आतापर्यंत त्याने वेड्डेल समुद्रात 150 किलोमीटरचा प्रवास केला आहे.

ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेच्या हॅले रिसर्च स्टेशनमधील संशोधकांनी या ‘ए 81’ चे फुटेज बनवले आहे. अंटार्क्टिकामधून ब्रिटनकडे परत जात असताना हे फुटेज बनवण्यात आले. हा व्हिडीओ 13 मार्चला प्रसिद्ध करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून संशोधकांनी या हिमनगावर लक्ष ठेवले आहे.

Back to top button