जगातील सर्वात मोठी रोटी ‘लावश’!

Biggest Roti आर्मेनियात भल्या मोठ्या आकाराची रोटी बनते.
Biggest Roti आर्मेनियात भल्या मोठ्या आकाराची रोटी बनते.

लंडन : आपल्याकडे गुजरातमध्ये मोठ्या आकाराची रोटी (Biggest Roti) बनते. पंजाबमध्येही 'रुमाली रोटी' नावाची मोठ्या आकाराची रोटी पाहायला मिळते. मात्र, जगातील सर्वात मोठी रोटी (Biggest Roti) कुठे बनते हे माहिती आहे का? आर्मेनियात अशी भल्या मोठ्या आकाराची रोटी बनते. सामान्य रोटीपेक्षा आठ ते दहापट मोठ्या आकाराची ही रोटी असते. या रोटीला 'लावश' असे नाव आहे.

ही रोटी (Biggest Roti) मुळात आर्मेनियाची असली तरी ती अझरबैजान, इराण आणि तुर्कीमध्येही लोकप्रिय आहे. ती तंदूरमध्ये भाजली जाते. या रोटीची वर्णी युनेस्कोच्या यादीतही आहे हे विशेष. या रोटीशी निगडीत अनेक परंपराही आहेत. विशेष म्हणजे एकदा बनवल्यावर या रोटीची घडी घालून ती व्यवस्थित पॅकबंद केल्यावर अनेक दिवस ठेवता येऊ शकते. पीठ, पाणी, यीस्ट, साखर आणि मीठ यांच्यापासून ही रोटी बनवली जाते. काही ठिकाणी साखर व यीस्टशिवायही ती बनवतात.

Biggest Roti : अनेक वेळा तंदूरमध्ये भाजण्यापूर्वी तिच्यावर तीळ आणि अफूचे बीजही पसरवले जातात. दोनही हातांनी ती फैलावून मग तिला तंदूरमध्ये टाकले जाते. ही रोटी मुलायम राहावी म्हणून तिला विशिष्ट पद्धतीने घडी घालून ठेवले जाते. दुकानांमध्ये ती अशा घडीमध्येच विक्रीस ठेवतात. ती वर्षभरही टिकवून ठेवली जाते व पापडासारखी खाल्ली जाते.

ही रोटी मुलायम राहावी म्हणून तिला विशिष्ट पद्धतीने घडी घालून ठेवले जाते. दुकानांमध्ये ती अशा घडीमध्येच विक्रीस ठेवतात. ती वर्षभरही टिकवून ठेवली जाते व पापडासारखी खाल्ली जाते.

-हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news