हळदी समारंभ …म्हणून नवरा-नवरीला लावली जाते हळद | पुढारी

हळदी समारंभ ...म्हणून नवरा-नवरीला लावली जाते हळद

मुंबई : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. लग्नसमारंभात सर्वात महत्त्वाचा आणि शुभ दिवस हळदी समारंभाचा असतो. हिंदू धर्मात या हळदीच्या परंपरेला खूप महत्त्व आहे. या हळदीच्या समारंभात नवरदेव आणि नवरीला लग्नाच्या आधी हळद लावली जाते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का लग्नाआधी वधू आणि वराला का हळद लावली जाते?

सनातन धर्मात भगवान श्री हरि विष्णुला कर्ता-धर्ता मानले जाते. भगवान विष्णु जगाचे पालनहारी आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करण्यापूर्वी भगवान विष्णूचे पूजन केले जाते. भगवान विष्णूच्या पूजेत हळदीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार हळदीला सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. यामुळे लग्नापूर्वी नवरा-नवरीला हळद लावली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये देवगुरू बृहस्पतिचा विवाह आणि वैवाहिक नात्याचे कारक ग्रह मानले जाते. हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी असतो. अशात लग्नाच्या आधी नवरा नवरीला हळद लावल्याने गुरुची कृपा दांपत्याच्या जीवनावर होते, असे मानले जाते. यामुळे लग्नापूर्वी नवरा-नवरीला हळद लावली जाते. नकारात्मक ऊर्जेपासून दूर रहावे, यासाठीही ही हळद खूप फायदेशीर असते.

हे आहे वैज्ञानिक महत्त्व

हळद ही खूप गुणकारी असते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुण असतात जी त्वचा आणि शरीराला स्वच्छ, सुंदर ठेवण्यास मदत करते. हळद लावल्याने चेहर्‍यावर तेज येते आणि कोणत्याही प्रकारे त्वचेला संसर्ग होत नाही. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळेच हळदीचे महत्त्व केवळ धार्मिक नसून ते वैज्ञानिकदेखील आहे.

हेही वाचा :  

Back to top button