3-D printed chocolate : आता आले थ्री-डी प्रिंटेड चॉकलेट | पुढारी

3-D printed chocolate : आता आले थ्री-डी प्रिंटेड चॉकलेट

वॉशिंग्टन ः जगभरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्येही सातत्याने नवे प्रयोग होत असतात. आता अलीकडेच अमेरिकेत रट्गर्स स्कूल ऑफ एन्व्हायर्न्मेंट सायन्सच्या संशोधकांनी थ्री-डी प्रिंटरच्या (3-D printed chocolate) मदतीने एक नवा प्रयोग केला आहे. त्यांनी कमी फॅट असलेले चॉकलेट प्रिंट केले आहेत जे सामान्य चॉकलेटच्या तुलनेत अधिक आरोग्यदायी आहेत.

सध्या खाण्या-पिण्याच्या रेसिपींमध्ये काही बदल करून त्यांना अधिक ‘हेल्दी’ बनवले जात आहे. अशा पदार्थांना ‘फंक्शनल फूड’ही म्हटले जाते. या संशोधनात सहभागी क्विंगरोंग हुआंग यांनी सांगितले की हे चॉकलेट त्यांच्या ‘फंक्शनल फूडस्’च्या (3-D printed chocolate) लाईनमधील पहिला नमुना आहे. त्यांची टीम लो-शुगर आणि शुगर-फ्री चॉकलेटचे थ्री-डी प्रिंटिंग करण्यासाठीही संशोधन करीत आहे.

सामान्य चॉकलेटमध्ये कोकोआ बटर, कोकोआ पावडर, साखर आणि एखाद्या इमल्सिफायर मिसळलेले असते. (3-D printed chocolate)नव्या चॉकलेटच्या थ्री-डी प्रिंटिंग करण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक रेसिपी हाताळल्या. ज्या रेसिपीला निश्चित केले त्यामध्ये शुद्ध कोकोआ बटरऐवजी बाभळीच्या झाडाचे इमल्शन वापरण्यात आले. तसेच त्याचा स्वाद अधिक चांगला होण्यासाठी त्यामध्ये गोल्डन सिरप मिसळण्यात आले. हा सिरप उसाच्या रसापासून बनवलेला असतो. हे थ्री-डी प्रिंटेड चॉकलेट बनवण्यासाठी अनेक मापदंडांचा विचार करण्यात आला.

हेही वाचा :  

Back to top button